Home | Maharashtra | Vidarva | Akola | Illegal pesticide sale; Three companies have criminal charges

बेकायदा कीटकनाशक विक्री; तीन कंपन्यांना फौजदारी डाेज; कृषि विभागाच्या तक्रारीनंतर झाले गुन्हे दाखल

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 09:59 AM IST

कीटकनाशकाचा नियमबाह्य साठा व विक्री करुन तीन कंपन्यांनी शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी रामदास पेठ पोलीस

 • Illegal pesticide sale; Three companies have criminal charges

  अकाेला- कीटकनाशकाचा नियमबाह्य साठा व विक्री करुन तीन कंपन्यांनी शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात अाली.


  रामदास पेठ पाेलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीनुसार मे. महेश एन्टरप्राईजेसने कृषि विभागाकडे परवान्यामध्ये नवीन कीटकनाशकाची सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर केला हाेता. या प्रस्तावानुसार मे. क्रिस्टल क्राॅप प्राेटेक्शन प्रा. लि.चे प्रिंसीपल सर्टीफिकेटमध्ये नमूद असतानाही कीटकनाशके मात्र नागपूर येथील मे. गाेविंद एन्टरप्राईजेसकडून खरेदी केल्याचे दिसून अाले.


  बनावट उत्पादन
  एफअायअारमध्ये बनावट उत्पादन व फसवणूक केल्याचे नमूद अाहे. अाराेपींनी संगनमत करुन इमानॅटीन बेन्झाेराट, एसजी (मिसाईल) व बुरशीनाशक कार्बेनडेंझम बाविस्टीनचे बनावट उत्पादन, विक्री करुन फसवणूक केली. याप्रकरणी अाराेपींविरुद्ध भादंविचे कलम ४२० (फसवणूक), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.


  या अाहेत त्या कंपन्या
  कीटकनाशक अवैधरीत्या विक्री व साठा केल्याप्रकरणी कृषि विभागाने मे. गाेविंद एन्टरप्राईजेस (नागूपर) , मे. महेश एन्टरप्राईजेस (अकाेला) अाणि मे. क्रिस्टल क्राॅप प्राेटेक्शन प्रा. लि. विरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे नमूद केले हाेते. मे. क्रिस्टल क्राॅप प्राेटेक्शन प्रा.लि.चे याप्रकरणात हितसंबंध असण्याची शक्यता अाहे, असेही तक्रारीत नमूद केले हाेते.

Trending