Home | International | Other Country | illegal possession on shilpa shettys bunglow

शिल्पा शेट्टीच्या अलिशान बंगल्याचा अज्ञात लोकांनी घेतला ताबा

Agency | Update - May 29, 2011, 08:06 PM IST

ब्रिटनच्या कायद्यानुसार तिथे रिकाम्या असलेल्या बंगल्यात कोणीही जाऊन राहू शकतो फक्त त्यासाठी एकच अट आहे

  • illegal possession on shilpa shettys bunglow

    लंडन- शिल्पा शेटटी आणि राज कुंद्रा यांच्या लंडन येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या २२ कोटी रूपयाच्या आलिशान बंगल्याचा अज्ञात सहा लोकांनी ताबा घेतला आहे. ब्रिटनच्या कायद्यानुसार तिथे रिकाम्या असलेल्या बंगल्यात कोणीही जाऊन राहू शकतो फक्त त्यासाठी एकच अट आहे की त्या बंगल्याचे कुलूप तोडायचे नाही किंवा त्या बंगल्याच्या मालमत्तेस इजा पोहोचवयाची नाही.

    त्यांच्या वुडलॉन कॉटेज नावाच्या या बंगल्यात सध्या सहा लोक राहतात. त्यांनी असा दावा केला आहे की या बंगल्यात ते सहा वर्षांपूर्वीच आले तेव्हा याचे कुलूप आधीच तोडले होते आणि कुणी राहत देखील नव्हते त्यामुळे आमचे येथे राहणे कायदेशीररित्या योग्य आहे. या बंगल्याच्या भोवती इतर सेलिब्रिटीजचे देखील बंगले आहेत.

    या बंगल्यात यापूर्वी गायक एल्टन जॉन, माजी बीटल रिंगो स्टार आणि हॉलिवूड अभिनेत्री केंट विन्सलेट राहिलेले आहेत.

Trending