आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध गर्भलिंगनिदान : विमल मदर केअरचे चेंबर उघडले, तळघरातील तीन खोल्यांत सापडले 3 चेंबर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बेकायदा गर्भपाताच्या रॅकेटमधील अटक केलेल्या वर्षा सरदारसिंग शेवगण उर्फ अंजली अजय राजपूत (३८) हिच्या एपीआय कॉर्नर येथील विमल मदर केअर सेंटरचे चेंबर पोलिसांनी उघडले. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या इमारतीच्या तळघरात तीन खोल्या असून त्यात ३ चेंबर सापडले आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.विमल मदर केअर सेंटर गीता शेवगण हिच्या नावावर आहे. 

 

या इमारतीत कन्नड येथील नाचनवेल येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या वर्षा राजपूत राहतात. त्याचे पतीदेखील वैद्यकीय अधिकारी आहेत. २२ जानेवारी रोजी "दिव्य मराठी' आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी उस्मानपुरा येथील भाजीवालीबाई चौकात केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉ. सूरज सूर्यकांत राणा हा गर्भनिदान करत असल्याचे स्पष्ट आले. त्याच्याच चौकशीत वर्षा राजपूत हिचे नाव समोर आले होते. गर्भनिदान झाल्यावर भ्रूणहत्येसाठी महिला वर्षा राजपूत हिच्याकडे येत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गर्भपात केल्यानंतर भ्रूण हे दवाखान्यातील शौचालयात किंवा ओटीरुमधील डक चेंबरमध्ये भ्रूण टाकून फ्लश करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी विमल मदर केअर सेंटरचे दवाखान्यातील आणि दवाखान्याच्या बाहेरील चेंबर्स उघडले. तेव्हा दोन मजली इमारतीच्या तळघरात चार रुम आढळून आल्या असून एका रुममध्ये दोन तर दुसऱ्या दोन रुममध्ये दोन चेंबर्स सापडले. 

 

घरातील छोट्या चेंबरचे थेट मोठ्या चेंबरला कनेक्शन 
पोलिस-मनपा पथकाच्या कारवाईत विमल सेंटरमध्ये सापडलेल्या छोट्या चेंबर्सचे कनेक्शन थेट दवाखान्यासमोर असलेल्या पार्किंगमधील तीन मीटर खोल चेंबर्समध्ये जोडलेले होते. या चेंबर्सची पाइपलाइन मुख्य रस्त्यावर असलेल्या गटारीच्या पाइपलाइनला जोडली असल्याचे समोर आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक मीरा लाड यांच्या पथकाने केली. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. २९ जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या मूळ अंबड येथील रहिवासी असलेल्या व रोशन गेट भागात राहणाऱ्या डॉ. नइमोद्दीन रफिक शेख (४८) याची वैद्यकीय पदवी बोगस असल्याचे तपासात समोर आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...