आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड : सरसम बु.सज्जा अंतर्गत येणाऱ्या (विठ्ठल - रुख्मिणी मंदिर) विठ्ठलेश्वराच्या नावाने असलेल्या इनामी जमिनीतील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली. शेतीचा ठेका घेतलेल्या ठेकेदारानेच ही झाडे कापून काढली. याची पारदर्शक चौकशी करून सबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी गावातील जागरूक नागरिक आणि पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार एन.बी. जाधव यांच्याकडे केली आहे.
सरसम सज्जाअंतर्गत शेत सर्वे नंबर ६२ मधील ५ हेक्टर ५७ आर आणि शेत सर्वे नंबर ६२/१ मधील ५ हेक्टर ५७ आर अशी ३० एकर जमीन विठ्ठलेश्वराचे अर्चक मल्लिकार्जुन वीरभद्र व विठ्ठलेश्वर देवस्थान इनामी अशी नावे सातबारावर आहे. मागील कित्येक पिढ्यांपासून सरसम येथील विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापन, पूजा, धर्म कार्यक्रम प्रसंगी खर्च करणे, मंदिराची देखभाल करणे करीत ही जमीन मल्लिकार्जुन वीरभद्र यांचे हयातीपर्यंतही त्यांच्या ताब्यात होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे वंशज जमिनीची मालकी सांभाळायचे. दरम्यानच्या काळात ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ही जमीन महसूलच्या ताब्यात घेण्यात आली. त्याचा वाद आजही न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु गतवर्षीपासून जून महिन्यात तहसील कार्यालयाकडून लिलाव करून कसण्यासाठी दिली जात आहे. लिलाव प्रक्रिया ९५ हजारांवर पोहाेचल्याने हा लिलाव घेणाऱ्या शेतकऱ्याने लिलावाची रक्कम भरली नसल्याने त्याचा बोझा प्रकाश गायकवाड यांच्या नावाने सर्वे नंबर ८७/४ या जमिनीवर तहसीलने टाकला. तेंव्हापासून लिलाव प्रक्रिया बंद पडली. परंतु अचानक जूनमध्ये सरसम येथील सूचना फलकावर कोणतीही नोटीस न लावता, वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन न देता, गावात दवंडी न फिरवता काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शे.बाबू यांना अतिशय अल्प दरात केवळ ५० हजार रुपयांत ३० एकर जमिनीचा खरीप, रब्बी हंगामासाठी ताबा देण्यात आला. वास्तविक पाहता ज्यांचे नावे सरसम सज्जात जमीन आहे, जो त्या गावचा रहिवाशी आहे अशा शेतकऱ्यास जमीन देण्याचे असताना नियम खुंटीला टांगून ही जमीन दिल्याचे तक्रार करणाऱ्याचे म्हणणे आहे.
विनापरवाना कत्तल
त्यामुळे संबंधित शेतीचा ठेका घेणाऱ्याकडून खरीप हंगाम घेऊन शेतीची वहिवाट बांधाची धुरे यात मोठा बदल करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता सदर शेतकऱ्याने जमिनीत वीस वर्षांपासून वाढलेली महाकाय झाडे महसूलकडून कुठलीही परवानगी न घेता तोडून झाडांची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकारात तहसीलच्या काही अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही तक्रारकर्त्यानी केला आहे. याची माहिती नागरिकांनी पत्रकारांना दिल्यानंतर पत्रकार संघटनेने तहसीलदार एन.बी.जाधव यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष घालण्याची मागणी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.