आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील अवैध वृक्षतोड : ६३ महिन्यात २.३४ लाख सागवान झाडांची झाली कत्तल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील जंगलतोडीमागे बेकायदेशीर वृक्षतोड हे एक प्रमुख कारण असल्याचे वनखात्याच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. गेल्या ६३ महिन्यात म्हणजे पाच वर्षात राज्यात ५,६१,४१० झाडांची बेकायदेशीर जंगलतोड झाली. यामध्ये २,३४,२१६ सागवानाची झाडे आहे. वनखात्याने जून २०१८ मध्ये अद्ययावत केलेल्या अहवालातील ही ताजी आकडेवारी आहे. जानेवारी २०१३ ते मार्च २०१८ या कालावधीत राज्यात २५ कोटी ९५ लाख २७ हजार रूपये किमतीच्या सागवान झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली. 


वनखात्याच्या अहवालानुसार जलतन तसेच कृषी उपयोगासाठी ग्रामस्थांकडून नेहमीच अवैध वृक्षतोड करण्यात येते. अनेकदा उपजीविकेसाठी वृक्षतोड केली जाते. असे असले तरी गेल्या पाच वर्षात संघटितरित्या जंगलतोड करण्यात तस्करांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे अहवालत नमुद करण्यात आले आहे. विशेषत: शेजारील राज्यांत सागवान झाडांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील सिराेंचा डिव्हीजन, चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा उपविभाग, औरंगाबाद सर्कलमधील नांदेड विभाग, धुळे सर्कलमधील यवतमाळ आणि नंदुरबार िवभाग आणि नाशिक फाॅरेस्ट सर्कलमधील पूर्व आणि पश्चिम िवभागातून मोठ्या प्रमाणावर अवैध सागवान तोड होत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. 


जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत एकूण १०,३४१ सागवान झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यात आली. यात औरंगाबाद सर्कलमध्ये सर्वाधिक ३,३४२ सागवान झाडे तोडण्यात आली. यवतमाळमध्ये २,०७५, धुळ्यात १,१०९ आणि नागपूर सर्कलमध्ये ७०९ झाडे तोडण्यात आली. सागवान वृक्षासह इतर झाडांच्या अवैध तोडणीतही औरंगाबाद सर्कल ३,७४४ वृक्षांसह टाॅपवर आहे. ठाणे सर्कलमध्ये २,३८१, गडचिरोली २,३३२, यवतमाळ २,३२२, धुळे २,१७१ आणि नागपूर सर्कलमध्ये २,०२१ झाडांची कत्तल करण्यात आली. 


अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहे. शेजारील राज्यात सागवान तस्करी हाेऊ नये म्हणून गडचिरोली िवभागात बोट पॅट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. या शिवाय आंतर राज्य समन्वय बैठका घेण्यात येत अाहे. पोलिस आणि वनविभागाकडून सयुक्त कारवाई करण्यात येत असल्याने आतापर्यत सुमारे ३१२ सागवान तस्करांनी शरणागती पत्करली आहे. 

बातम्या आणखी आहेत...