आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी नाराज नाही, कुणालाही हानी पोहोचणार नाही असाच भूकंप! पंकजा मुंडेंचे संकेत; आज गाेपीनाथगडावरून बाेलणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मी निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. म्हणूनच आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मी भाजपवर नाराज आहे, असा नाही. माझी जी काही भूमिका आहे ती गुरुवारी गाेपीनाथगडावरून मांडणार आहे. अशी चर्चा आहे की पंकजा मुंडे भूकंप करणार. भूकंप ही काही चांगली गाेष्ट नाही...पण कुणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न मी करेन,' असे संकेत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

पराभवानंतर पंकजा मुंबईतच हाेत्या. पक्षाच्या बैठकांकडेही त्यांनी पाठ फिरवली. १२ डिसेंबरला गाेपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आपण भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हाेते, त्यामुळे याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. बुधवारी पंकजांनी परळीत तयारीचा आढावा घेतला. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'ओबीसी भाजपपासून दूर जात असतील तर तसे हाेऊ नये म्हणून काम करायला हवे. आपल्या नेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना लाेकांमध्ये असेल तर त्याकडेही लक्ष द्यायला हवे. खडसेंनी नाराजी बाेलून दाखवली. मी मात्र बाेललेले नाही,' असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. ते मुंबईत माझ्या घरीही आले हाेते.

देवेंद्र फडणवीसांवर टाेलेबाजी

'काही नेत्यांचे तिकीट कापले गेले. हे निर्णय महाराष्ट्रातूनच झाले. केंद्रीय नेतृत्वाला माहिती देणे हे राज्यातील नेतृत्वाचे काम आहे. जसे आपण यश स्वीकारताे तसे अपयशही स्वीकारले पाहिजे. भाजप सत्तेत असताना विराेधी पक्षनेते (धनंजय मुंडे) सक्षम झाले', अशी खंतही पंकजांनी व्यक्त केली. 'मी पुन्हा येईन' ही प्रचाराची टॅगलाईन हाेती, त्यात मला अहंकार वाटला नाही, अशी पुष्टीही त्यांनी जाेडली.

आता मी आघाडीवर टीका करू शकत नाही

अजित पवारांना साेबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली. हा निर्णय एकट्या फडणवीसांचा नसावा. मात्र या घडामाेडीमुळे मी आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र कसे आले, अशी टीका करू शकत नाही,' असे सांगत पंकजांनी भाजपच्या 'त्या' निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
 

बातम्या आणखी आहेत...