Home | International | China | imf election cihna- france together

नाणेनिधीवरील वर्चस्वासाठी चीनकडून फान्सशी वाटाघाटी

agency | Update - May 26, 2011, 08:21 PM IST

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक कान यांच्या राजीनाम्यानंतर युरोपीय व्यक्तीची नियुक्ती नको, अशी जाहीर भूमिका ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी घेतली असली तरी चीनचा फ्रान्सला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून नाणेनिधीच्या प्रमुखपदी भारतातील कोणतीही व्यक्ती चीनला नको आहे.

 • imf election cihna- france together

  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक कान यांच्या राजीनाम्यानंतर युरोपीय व्यक्तीची नियुक्ती नको, अशी जाहीर भूमिका ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी घेतली असली तरी चीनचा फ्रान्सला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात असून नाणेनिधीच्या प्रमुखपदी भारतातील कोणतीही व्यक्ती चीनला नको आहे.

  तज्ञांच्या माहितीनुसार, चीन हा फ्रान्स देशांशी सौदा करत असून फान्सचे अर्थमंत्री लागार्थ यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वी ब्रिक्स देशांनी नाणेनिधीचा प्रमुख हा विकसनशील देशाचा व्हावा, अशी भूमिका घेतली आहे. यावर आजही ब्रिक्समधील देश सहमत आहेत. मात्र चीनने फान्सशी अंर्तगत सलगी सुरु केली असून भारताचे या संस्थेवर वर्चस्व वाढू नये म्हणून त्यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. यामागे चीनचे नाणेनिधीवर वर्चस्व मिळावण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे.

  चीन आयएमएफच्या उपव्यवस्थपकीय संचालकपदी आपल्या देशातील व्यक्तीची निवड करु इच्छित आहे. सध्याचे उपव्यवस्थपकीय संचालक काही महिन्यात निवृत्त होत असून त्याच्यासाठी चीन फ्रान्सशी सौदा करत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे युरोपीय देश नाणेनिधीसारखे मलईदार संस्थेचे प्रमुखपद इतरांकडे देण्यास तयार नाही. त्यातच युरोपीय देशांकडे नाणेनिधीची ३२ टक्के मते आहेत. त्यामुळे फ्रान्सही चीनचा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  विकसित देशांतील आर्थिक मंदीमुळे आयएमएफसारख्या संघटनांमध्ये सुधारणांची गरज अधोरेखित झाली असून विकसनशील देशांना महत्त्व देण्याची आवश्यकता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.

  माँटेक सिंग अपात्र?
  वित्त व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेक सिंग अहलुवालिया यांचे नाव आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालकपदासाठी चर्चेत असले, त्य़ांचे नाव वयोमर्यादेमुळे मागे पडणार आहे. माँटेक सिंग यांचे वय ६७ असून या पदासाठी ६५ पेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आयएमएफमधील भारताचे प्रतिनिधी अरविंद वीरमणी यांनी वृत्तवाहिनीतील मुलाखतीत व्यक्त केली. तरीही वयाची अट सर्व सदस्य देशांच्या बहुमताने वगळण्याची तरतूद नियमांमध्ये असल्याने भारत याकडे लक्ष ठेवून आहे.

Trending