Home | International | Other Country | imf former chief strauss kan gets bail in new york

आयएमएफचे अध्यक्ष स्ट्रॉस कान यांना जामीन

Agency | Update - May 20, 2011, 12:30 PM IST

आयएमएफचे माजी अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस कान यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

  • imf former chief strauss kan gets bail in new york

    न्यूयॉर्क - न्यूयॉर्कमधील मॅनहॅट्टन उपनगरातल्या सोफिटेल हॉटेलमधील महिला कर्मचारीवर शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेले आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे (आयएमएफ) माजी अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस कान यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

    न्यूयॉर्क सिटी कारागृहातून त्यांची मुक्तता करण्यात असली तरी त्यांना घरामध्ये नजरकैदेत ठेवले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. कान यांना मॅनहॅट्टन येथील घरी पत्नीसह राहण्यास परवानगी मिळाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा जूनला होणार आहे. तोपर्यंत त्यांना नजरकैदेत रहावे लागणार आहे.

    स्ट्रॉस कान यांच्यावर शारिरीक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, कान यांच्या राजीनाम्यानंतर आयएमएफचे पहिले उपसंचालक जॉन लिप्स्की हे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहेत. अध्यक्ष पदासाठी भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांची निवड होण्याची शक्यता आहे. स्ट्रॉस कान यांना फ्रान्सच्या अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गणले जात होते.

Trending