आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IMF: International Monetary Fund (Imf) On India Economy Slowdown, Says Urge Narendra Modi Government To Take Urgent Policy Actions

भारतीय अर्थव्यवस्थेत गंभीर मंदीचे सावट, पीएम मोदींना लवकरात लवकर उपयायोजना कराव्या लागतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या गंभीर मंदीचे सावट असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील लाखो लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर पडले. तरीही याच दरम्यान देशाचा आर्थिक विकास दर कमकुवत झाला. आयएमएफने भारतावर आपला वार्षिक अहवाल जारी केला आहे. त्यामुळे, भारतीय अर्थव्यवस्था आणखी खालावणार असा अंदाज आहे. अशात आर्थिक सुधारणांसाठी कठोर पावले उचलण्यासाठी नितांत गरज आयएमएफने व्यक्त केली आहे. बहुमत असलेल्या सरकारकडे काही करून दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे, सकल आणि चिरंतन विकासासाठी सरकारला लवकरात लवकर मोठी पावले उचलावी लागणार आहेत.

आयएमएफच्या आशिया प्रशांत महासागर विभागातील भारत प्रमुख रानिल सलगादो यांनी सांगितल्याप्रमाणे, "2019 च्या पहिल्या सहामाहीत विविध कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास मंदावला. भारताची अर्थव्यवस्था मंदावली हाच मूळ मुद्दा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आलेली ही मंदी संरचनात्मक नव्हे, तर चक्रीय आहे. आर्थिक क्षेत्रात आलेले संकट याचे मुख्य कारण आहे. यात अपेक्षेप्रमाणे लवकरात-लवकर सुधारणे होणार नाही हेही तितकेच सत्य आहे." सलगादो पुढे म्हणाले, चालू वर्षाच्या दुसऱ्या त्रैमासिकात जीडीपीचा वृद्धी दर केवळ 4.5 टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या 6 वर्षांतील नीचांक आहे. आकडेवारीतून दिसून येते की त्रैमासिकात अंतर्गत मागणी केवळ 1 टक्का वाढली आहे. याचे कारण बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) च्या कर्जांमध्ये कमतरता आहे. यासोबतच व्यापक प्रमाणात कर्जावरील स्थिती कठोर झाल्या आहेत. लोकांच्या उत्पन्नात, त्यातही ग्रामीण भागातून होणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

बातम्या आणखी आहेत...