आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईचा सुधारित पुरवणी आराखडा तातडीने सादर करा: शालिनी विखे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- टंचाईबाबतचा सुधारित पुरवणी आराखडा तातडीने सादर करावा, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी शुक्रवारी केली. 


जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष विखे यांच्या अध्यक्षतेखाली या सभेत विविध विषयावर चर्चा करून सूचना देण्यात आल्या. सभेत विखे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांचाही बाबतचा सुधारित पुरवणी आराखडा तातडीने सादर करण्याची सूचना दिली. त्याचबरोबर टॅंकरने पाणीपुरवठा करते वेळी कुठलाही टॅंकर गळका असू नये, तसेच त्यांचे पूर्ण क्षमतेने भरलेले असावेत याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ग्रामपंचायतीच्या जमिनीवर झाडे लावून ती झाडे तीन वर्षापर्यंत सांभाळायची व नंतर ग्रामपंचायतीच्या ताब्यात घ्यायची. जेणेकरून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांसाठी चाऱ्याची व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या छावण्या तातडीने सुरू करण्याबाबत जिल्हाधिका ऱ्यांना विनंती करण्याची सूचनाही या सभेत मांडण्यात आली. 

 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, सदस्य हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जगन्नाथ भोर आदी यावेळी उपस्थित होते. 
 

बातम्या आणखी आहेत...