आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Immigrants From Parbhani Who Came In Search Of Work Have Built Up A Separate Village In The In Dhule

जगात जर्मनी, मराठवाड्यातच नव्हे तर धुळ्यातही 'परभणी', स्थलांतरितांनी वसवले गाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चौथी पिढी नांदत असलेल्या धुळ्यातील परभणीत पक्की घरेही बांधली गेली आहेत. - Divya Marathi
चौथी पिढी नांदत असलेल्या धुळ्यातील परभणीत पक्की घरेही बांधली गेली आहेत.

धुळे : पाेटाची खळगी भरायला अन् भुकेची आग विझवायला गावाेगाव निघालेल्या स्थलांतरितांनी धुळे शहरातच एक गाव वसवले. त्याचे नाव ठेवले 'परभणी'. मुळात परभणी हा स्वतंत्र जिल्हा आहे. धुळे शहरातील 'परभणी'तही मराठवाडी धाटणीच्या संस्कृतीचे अवशेष आढळतात. सध्या या वस्तीवजा गावात स्थलांतरितांची चाैथी पिढी नांदतेय. शहरातील या भागात व सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील नागरिक आहेत. म्हणून या परिसराची ओळख परभणी झाली आहे. सन १९७० ते १९७३ च्या सलग दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यातील लोक धुळे शहरात रोजगाराच्या शोधासाठी आली. ते आले आणि येथीलच होऊन गेले आहेत. देवपुरातील इंदिरानगर व सुशी नाल्यालगत हा 'परभणी'चा पट्टा आहे. बहुतांश परिवार अल्पशिक्षित आहेत. दीडशे ते दोनशे कुटुंबाच्या या वसाहतीत बोटावर मोजण्याइतकेच उच्च शिक्षित आहेत.

नागरिकत्वासाेबत मिळाला मतदानाचा हक्क; अतिक्रमित वस्ती असल्याने सुविधांची वानवा

बोलीभाषा वेगळीच...
तब्बल ९५ टक्के परभणीवासी अद्यापही गवंडी काम, विहिरींचे खोदकाम, हातमजुरी करून प्रपंच चालवत आहेत. विभिन्न जाती-धर्मांचे लोक या परिसरात वास्तव्यास असले तरी त्यांची ओळख ही परभणीकर म्हणूनच आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील वास्तव्यास असलेले परभणीकर अजूनही आपले मराठवाडी सण, उत्सव या परिसरात साजरे करतात. आपली वेगळे संस्कृती राहणीमान, बोलीभाषेचेही संवर्धन होत आहे.

शहराचे नागरिक करतात मतदान

परभणी येथून आलेले आणि आता धुळेकर झालेल्यांपैकी काहींची तिसरी ते चौथी पिढी या परिसरात वास्तव्यास आहे. आता तर ते अधिकृत धुळेकर झालेले आहेत. सर्वांकडे शहराचे नागरिकत्व असललेे अाधार कार्ड आहे. शिवाय धुळे विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीदेखील आहे. मात्र, अतिक्रमित झोपडपट्टी असल्यामुळे हक्काच्या सातबाऱ्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या परिसरात पालिकेनेही थोडी फार कामे केली आहेत. मात्र, भौतिक सुविधांची वानवा आहेच. रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरात संघर्ष करावा लागतोच.
 

बातम्या आणखी आहेत...