आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांच्या ९० टक्के सहली रद्द, बुकिंगचे पैसे परत मिळण्यास विलंब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एप्रिल-मे-जून-जुलै हे महिने प्रामुख्याने विदेशी पर्यटनाचे समजले जातात. पण सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘कोरोना’च्या भीतीने बहुतांश पर्यटकांनी आपल्या विदेशवाऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सार्वत्रिक चित्र समोर आले आहे. कोरोनाची भीती इतकी आहे, की सुमारे ९० टक्के पर्यटकांनी आरक्षित विदेशवाऱ्या रद्द केल्याची आकडेवारी एन्टरप्राईजेस ट्रॅव्हल एजंटस असोसिएशनच्या वतीने बुधवारी सांगण्यात आली. राज्यात पुण्यातून दरवर्षी तब्बल ५० ते ७० हजार पर्यटक विदेशवारी करतात. कोरोनाच्या साथीमुळे हे सारे आरक्षण रद्द झाल्याने एकूणच पर्यटन व्यवसाय धास्तावला आहे. विदेशांतील पर्यटन रद्द करणाऱ्या पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाचा पर्याय अवश्य निवडावा, असे आवाहनही टूर ऑपरेटर्सतर्फे करण्यात आले आहे. असोसिएशनचे पदाधिकारी विजय मंडलिक, सुरेंद्र कुलकर्णी म्हणाले,‘मध्यपूर्वेतील देश, तसेच युरोप, अमेरिका- कॅनडा सहलीही पर्यटकांनी रद्द केल्या आहेत. देशांतर्गत तरी सहल करण्याचे आवाहन

केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच ट्रॅव्हल अॅडव्हायझरी (पर्यटन मार्गदर्शिका) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पर्यटकांनी घाबरून न जाता, योग्य ती काळजी घेऊन देशांतील विविध ठिकाणांना जरूर भेटी द्याव्यात. विदेश सहलींविषयीची पर्यटकांची भीती समजू शकते. पण निदान आपल्या देशातील विविध स्थळांना तरी पर्यटकांनी भेटी द्याव्यात. देशांत कित्येक ठिकाणे या दृष्टीने सुरक्षित आहेत. पर्यटकांनी त्यांचा विचार करावा आणि डोमेस्टिक टुरिझम करावे, असे आवाहन टूर ऑपरेटर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...