आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका झाडाचे ५ कोटींचे फायदे, दरवर्षी ३० लाख रुपयांचा ऑक्सिजन पुरवते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क - जगभरात आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जागरुकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या नैसर्गिक स्रोतांचा महत्त्वाचा भाग आहे झाड-रोपटे व वन. वनांची घटती संख्या पाहता त्यांच्या संवर्धनावर भर देणे आता आणखी आवश्यक झाले आहे. एक झाड केवळ सावली आणि ऑक्सिजनच देत नाही तर याचे मूल्य त्यापेक्षा खूप जास्त असते. हे जाणून घेण्याचे सुरुवातीचे प्रयत्न भारतातच झाले होते. १९७९मध्ये कलकत्ता विद्यापीठातील प्रा. डॉ. तारक मोहन दास यांनी एक अभ्यास केला होता. त्यात त्यांनी झाडाचे मूल्य सांगितले होते. डॉ. दास यांनी सांगितले होते की, एक झाड आपल्या ५० वर्षांच्या जीवनात २ लाख डॉलरची सेवा देते. या सेवांमध्ये आॅक्सिजनचे उत्सर्जन, मातीची धूप रोखणे, माती खतयुक्त करणे, पाण्याची पुनर्प्रक्रिया करणे आणि हवा शुद्ध करण्यासारख्या सेवा समाविष्ट आहेत. १९७९ चा  महागाई दर लक्षात घेऊन गणना केल्यास एका झाडाच्या सेवांचे मूल्य सुमारे ५ कोटी रु. होते. दिल्लीची एनजीओ दिल्ली ग्रीन्सने २०१३ मध्ये केलेल्या अभ्यासात एक निरोगी वृक्ष वर्षांत जेवढा ऑक्सिजन देतो, तो खरेदी करायचा झाल्यास ही किंमत ३० लाख रुपयांपेक्षाही जास्त होईल. एक-एक झाड अमूल्य आहे. मात्र, झाड लावण्याचे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे यातून दिसते.
 

वने असा बचाव करतात...

पूर रोखतात: वृक्षतोड झाल्यानंतर पुराची शक्यता २८% वाढू शकते

आयआयटी खरगपूरच्या एका अभ्यासानुसार देशात ज्या राज्यांत वन कमी आहे किंवा होत आहे, तिथे पुरामुळे जास्त नुकसान झाले आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या ५६ देशांच्या आकडेवारीच्या अभ्यासात ही बाब समोर आली. त्यानुसार, ज्या देशांमध्ये नैसर्गिक वनक्षेत्र १० टक्क्यांपर्यंत कमी झाले, तिथे पूर येण्याची शक्यता ४ ते २८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
 

औषध देते: जगात ५० हजारांहून जास्त रोपट्यांत औषधी गुणधर्म
अमेरिकेच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशननुसार, औषध तयार करता येऊ शकतील अशा जगात झाड-रोपट्यांच्या ५० हजार अशा जाती आहेत. चीननंतर सर्वात जास्त अशी रोपटी भारतात आहेत. चीनमध्ये ४९००  आणि भारतात ३००० रोपटी अशी आहेत, ज्यांचा औषधाच्या रूपात वापर करू शकतो. अमेरिकेत ४ पैकी एका औषधात जंगली रोपट्याचा वापर होतो.
 

आजारांपासून बचाव: दम्याची शक्यता ३३% कमी करतात ३४३ झाडे

ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासानुसार एक चौ. किमी ३४३ झाडे लावल्यास मुलांमध्ये दम्याची शक्यता ३३% पर्यंत कमी होते. अश पद्धतीने वन आजार पसरवणारे जीव, विशेषत: डासांना निवासी परिसरात येण्यापासून रोखते. उदा. ९० च्या दशकात पेरूमध्ये रस्त्यांसाठी वन कटाई केली. यामुळे तिथे मलेरिया रुग्णांची संख्या ६०० हून वाढून १.२ लाख वार्षिक झाली.

 

वार्षिक ३६००० जीव वाचणे शक्य:  दूषित पर्यावरणापासून वाचवतात

पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी संस्था नेचर कन्झर्व्हेसीच्या अभ्यासानुसार, शहरांत जास्त जास्त झाडे लावल्यास दूषित पर्यावरणामुळे होणारे मृत्यू ९ टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात आणि दरवर्षी ३६००० लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. एका अभ्यासानुसार, एक झाड वर्षभरात २० किलो धूळ शोषून घेत असते.

 

तापमान नियंत्रित करते, कर्ब वायू कमी करते 
झाड एखाद्या भागाचे तापमान 1 तेे 5 अंशांपर्यंत कमी करू शकते. वर्षभरात एक झाड २२ किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते.

 

दरवर्षी १०० किलो ऑक्सिजन देते 
एक झाड वर्षात100 किलोपर्यंत ऑक्सिजन देते. एका व्यक्तीस वर्षाला 740 किलो ऑक्सिजनची गरज असते.
 

पाऊस पाडते, पाणीपातळी वाढवते
एका झाडाच्या साहाय्याने वार्षिक 3500 लिटर पाणी पाऊस पाडू शकतो. प्रत्येक झाड 3700 लिटर पाणी जमिनीत पोचवते. यामुळे भूगर्भात पाणीपातळी वाढते.

 

पाणीसाठा करते, शहरांत पूर रोखते
पाणीसाठी करते. यामुळे दुष्काळाची शक्यता कमी होते.शहरांत 530 लिटर पाणी नाल्यात जाण्यापासून रोखत पुरापासून वाचवते.
 

हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करते
एक झाड 6 टक्क्यांपर्यंत स्मॉग (धूर व धुके) कमी करते. पूर्ण विकसित झाड प्रदूषित हवेतून 108 किलोपर्यंत लहान कण व वायू शोषू शकते.

 

शांतता आणि बचतीचा दिलासा देते
घराच्या आजूबाजूस योग्य ठिकाणी झाड लावल्यास एसीची गरज 30% कमी होते. यामुळे 20-50% वीज बचत होऊ शकते.आत येणारा गोंगाट 50% पर्यंत कमी होऊ शकतो.

 

मातीतील विषारी पदार्थ शोषते
एक झाड जवळपास 80 किलो पारा, लीथियम, लेड आदी विषारी धातू शोषून घेते. यामुळे माती जास्त कसदार आणि शेती करण्यायोग्य होते.
 

जैवविविधता राखण्यास मदत करते
अभ्यासानुसार, एक झाड लावून पक्ष्यांच्या ८० पर्यंत प्रजाती वाचवू शकतो. जगात २९९६ प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी ८४ प्राणी भारतात आहेत.
 

 

झाड व पावसाचे चक्र:  जास्त झाडे म्हणजे जास्त पाऊस

> पाण्यापासून वाफ बनण्याची प्रक्रिया.जलस्रोतांसोबत झाडांच्या पानांतूनही बाष्पीभवन होते. यामुळे हवेत आर्द्रता वाढते.
> वाफ थंड होऊन पाण्यात रूपांतरित होते. मोठे वृक्ष हवेतील आर्द्रता जास्त रोखतात, यामुळे जास्त पाऊस होतो.

> झाड जेवढे पाणी शोषते तेवढे त्याचा वापर करत नाही. पाने अतिरिक्त पाणी वाफेच्या रूपात हवेत सोडतात.

> पाणी पाझरून जमिनीत जाणे. झाड मुसळधार पावसाचे पाणी थाेपवते. यामुळे जमिनीत जास्तीत जास्त पाणी जाते.

बातम्या आणखी आहेत...