आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुल अर्पण केल्याने प्रसन्न होतात देवता, कोणत्या देवी-देवतेला कोणते फुल अर्पण करावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मशास्त्रात विभिन्न कर्मकांड सांगण्यात आली असून त्यामध्ये फुलांना विशेष महत्त्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती. अशा विलेस फुले महत्त्वाची असतात. धर्म शास्त्रानुसार देवाला आवडणारे विशेष फूल जर अर्पण केले तर देव लवकर प्रसन्न होतात. येथे जाणून घ्या, धर्म ग्रंथांमध्ये फुलांविषयी काय सांगण्यात आले आहे आणि कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे...


पुष्पैर्देवां प्रसीदन्ति पुष्पै देवाश्च संस्थिता
न रत्नैर्न सुवर्णेन न वित्तेन च भूरिणा
तथा प्रसादमायाति यथा पुष्पैर्जनार्दन।


अर्थ - फुल अर्पण केल्यामुळे देवता खुप प्रसन्न होतात. देवाला रत्न, सोने, भूरि, द्रव्य, व्रत, तपस्या किंवा इतर गोष्टी अर्पण केल्यामुळेही देव येवढे प्रसन्न होत नाही.


महादेव - महादेवाला धोत्र्याचे ,कन्हेरीचे फुल अर्पण करावे.


श्रीगणेश - आचार भूषण ग्रंथानुसार श्रीगणेशाला तुलसीदल सोडून सर्व प्रकारचे फूल अर्पण करू शकता. या उपायाने श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.


विष्णु- विष्णूला कमळ, जूही, कर्दळ, केवड़ा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चंपा, वैजयंती हे फुले विशेष प्रिय आहेत.


सूर्यदेव - सूर्यदेवाला कमळ, चंपा, पालाश, अशोक झाडाची फुले अर्पण करावीत.


श्रीकृष्ण- आपल्या प्रिय फुलांचे वर्णन करताना महाभारतात युधिष्ठिराला श्रीकृष्ण सांगतात की मला कुमुद, करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश व वनमालेचे फूले प्रिय आहेत.


पार्वती - महादेवाला आवडणारे फूल देवी पार्वतीला प्रिय आहेत. त्या व्यतिरिक्त बेल, पांढरे कमळ चंपा हे फूल पार्वतीला अर्पण करावे.


लक्ष्मी- लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय पुष्प कमळ आहे.