आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायत्रीला मानले जाते वेद-माता, याच देवीपासून झाली वेदांची निर्मिती, गायत्री मंत्राने होतात आपले विचार पवित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क- सर्व देवी-देवतांच्या पुजेमध्ये देवी गायत्रीची साधना सर्वश्रेष्ट मानली जाते. देवी गायत्रीला वेद माता म्हटले जाते. यांच्याद्वारेच वेदांची निर्मिती झाली आहे. म्हणून गायत्री मंत्राचा जाप करण्यासाठी ब्रह्म मुहूर्ताची वेळ श्रेष्ठ असते. आपण दुपारी किंवा सायंकाळीसुद्धा या मंत्राचा जाप करू शकतो. या मंत्रामुळे मनुष्याची एकाग्रता वाढते, मन शांत राहते आणि तनाव दुर होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार नारद पुराणमध्ये लिहिले आहे की,

 

गायत्री जाह्नवी चोमे सर्व पाप हरे स्मृतो।
गायत्रीच्छन्दसां माता लोकस्य जाह्नवी॥

या श्लोकाचा अर्थ आहे की, गायत्री आणि गंगा, दोन्ही पाप नष्ट करणाऱ्या देवी आहेत. गायत्री वेदमाता आणि गंगा लोकमाता आहे.


वृहदयोगी याज्ञवल्क्य स्मृति में लिखा है कि-
नास्ति गंगासमं तीर्थं न देव: केशवात् पर:।
गायत्र्यास्तु परं जायं न भूतो न भविष्यति॥

म्हणजेच गंगेसमान कोणतेही तिर्थ नाही, श्रीकृष्ण समान कोणताच देव नाही आणि गायत्री मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र जर करण्यासाठी आतापर्यंत निर्माण झाला नाही.

 

गायत्री या शब्दाचा अर्थ
गायत्री शब्दाचा अर्थ आहे की, जप करणाऱ्यांचे रक्षण करणारी देवी


देवी गायत्रीच्या पुजेमध्ये 24 अक्षरांच्या महामंत्राचा जप केला जातो
मंत्र- ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्॥ 


गायत्री मंत्राचा अर्थ: या संपूर्ण सृष्टीनिर्मात्याचे आपण ध्यान करतो, त्या परमात्माचा आशिर्वाद आपल्या बुद्धिला सद्मार्ग जाण्यासाठी सतत प्रेरणा देईल.


गायत्री पुजेचा सामान्य विधी
गायत्री देवीची पूजा प्रतिमेच्या रूपातही केली जाते.पुजेसाठी एका चौकटीत देवीची प्रतिमा स्थापन करा. पुजा करताना अगरबत्ती, दिवा, नैवेद्य, फळ-फूल इत्यादीचा उपयोग करावा. त्याव्यतिरिक्त आपण देवीची पुजा निराकार स्वरूपातही केली जाते या पुजेला मानसी पुजा म्हटले जाते. यासाठी सर्याचे चित्र, दिवा किंवा अग्निसमोर बसुन गायत्री मंत्राचा जप केला जातो. मंत्राचा जप सुरू असताना 'मेरुदंड' म्हणजे आपल्या कमरेला सरळ ठेऊन पद्मासनात बसावे. पुजा करताना आपले चेहरा पूर्व दिशेला असावे.

बातम्या आणखी आहेत...