Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | importance of good thinking motivational story

सुखी जीवनाची शिकवण : जे मिळते त्यातच समाधान मानायला शिका, अधिक लोभामुळे होते नुकसान

रिलिजन डेस्क | Update - May 25, 2019, 12:10 AM IST

श्रीमंत जमीनदार शेतात शेतकऱ्याने लावली  द्राक्ष वेल आणि जमीनदाराला रोज थोडे-थोडे द्राक्ष देऊ लागला...पुढे काय झाले?

 • importance of good thinking motivational story

  एका गरीब शेतकऱ्याने गावातील जमीनदाराच्या शेतात द्राक्ष वेल लावली. तो दररोज वेलीची देखरेख करायचा. त्याला पाणी आणि खत वेळोवेळी द्यायचा, शेतीकडे शेतकरी खूप लक्ष ठेवायचा. काही दिवसांनी वेल चांगली बहरली आणि फळ लागायला सुरूवात झाली. त्यामुळे एक दिवस शेतकऱ्याला वाटले की, वेल तर जमीनदाराच्या शेतात लावलेली आहे, म्हणून या फळावर मालकाचाही हक्क आहे. असा विचार करून शेतकरी दररोज थोडे-थोडे द्राक्ष त्या जमीनदाराला देऊ लागला.


  असेच काही दिवस निघून गेले, एक दिवस जमीनदाराच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याला वाटले की, द्राक्ष वेल तर माझ्या शेतात आहे त्यामुळे या संपूर्ण वेलीवर माझा हक्क आहे. त्यामुळे जमीनदाराने आपल्या नोकराला पाठवून शेतातील वेल काढून आणण्यास सांगितले. नोकर गेला आणि वेल काढून घरातील अंगणात आणून लावली. जमीनदाराच्या अशा वागण्यामुळे गरीब शेतकऱ्याला खूप वाईट वाटले आणि काहीही न बोलता तो तेथून निघून गेला.


  आता जमीनदाराने त्या वेलीचे देखरेख आपल्या नोकरांकडे सोपवली. ते सर्व नोकरदार दररोज वेलीची चांगली काळजी घ्यायचे पण हळू-हळू ती वेल सुकत होती. त्या जमीनदाराला काहीच कळते नव्हते की, वेल का सुकतेय. आणि एक दिवस वेल पुर्णपणे सुकून गेली. जेव्हा ती वेल अंगनातून काढण्यात आली तेव्हा जमीनदाराच्या लक्षात आले की, वेलीचे मुळ जमीनीमध्ये खोलवर गेलेच नाही. त्यामुळे ही वेल सुकून गेली. आपल्या अशा वागण्यामुळे जमीनदाराला अत्यंत वाईट वाटले.


  कथेची शिकवण
  या छोट्याशा कथेची शिकवण एवढीच की, आपल्याला जे मिळते त्यातच आपण समाधानी असले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा जास्त लोभ करू नये अन्यथा आपलेच नुकसान होते. जास्त मिळवण्याच्या नादात व्यक्ती स्वतःकडे असलेले गमावून बसतो.

Trending