Home | Jeevan Mantra | Dharm | importance of mahamrityunjay mantra for better health

आजारपणात कशामुळे केला जातो महामृत्युंजय मंत्राचा जप?

रिलिजन डेस्क | Update - Nov 11, 2018, 12:06 AM IST

फक्त धर्म नाही, स्वरांचे पूर्ण विज्ञान आहे या मंत्रामध्ये, मोठा स्वर आणि दीर्घ श्वासोश्वासाने या मंत्राचा उच्चार केल्यास

 • importance of mahamrityunjay mantra for better health

  देवांचे देव महादेव यांना मृत्यूचे देवताही मानले जाते. यांचे एक नाव महाकाल असेही आहे. यामुळे महादेवाला स्मशान निवासी असेही म्हणतात. शिवपुराणासहित विविध ग्रंथांमध्ये महामृत्युंजय मंत्रांविषयी सांगण्यात आले आहे. महादेवाला प्रसन्न करायचे असल्यास या मंत्राचा जप सर्वोत्तम मानण्यात आला आहे. एखादा व्यक्ती खूप आजारी किंवा जखमी असेल तर त्याच्या रक्षणासाठी या मंत्राचा संकल्प प्रभावी मानण्यात आला आहे. ग्रंथानुसार या मंत्र जपाने अकाल मृत्यू योग टाळता येऊ शकतो. हा अनेक लोकांसाठी जिज्ञासेचा एक विषय बनला आहे की, या मंत्रामध्ये असे काय आहे, ज्यामुळे याला एवढे प्रभावशाली मानले जाते.


  यामागे केवळ धर्मच नाही तर संपूर्ण स्वर सिद्धांत आहे. यालाच संगीताचे विज्ञानही मानले जाते. महामृत्युंजय मंत्राची सुरुवात ऊँ अक्षरापासून होते. याचा उच्चार मोठा स्वर आणि दीर्घ श्वासोश्वासाने केला जातो. अशाचप्रकारे संपूर्ण मंत्र वाचला जातो. वारंवार उच्चारला जातो. यामुळे शरीरात उपस्थिती असलेल्या सूर्य आणि चंद्र नाडीमध्ये कंपन उत्पन्न होते. आपल्या शरीरातील सप्तचक्रच्या जवळपास एनर्जीला संचार होतो. हा संचारच मंत्रउच्चार करणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होतो. नाडी आणि चक्रामध्ये ज्या ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे शरीरात शक्ती येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशाप्रकारे मोठा स्वर आणि दीर्घ श्वासोश्वासाने या मंत्राचा उच्चार केल्यास आजारपणातून लवकर मुक्ती मिळते.


  अशाप्रकारे करावा जप
  रोज सकाळी स्नान केल्यांनतर रुद्राक्षाच्या माळेने या मंत्राचा 108 वेळेस जप करावा.


  महामृत्युंजय मंत्र :
  ऊँ त्र्यंबकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्द्धनम्,
  ऊर्वारुकमिव बन्धनात, मृत्योर्मुक्षियमामृतात्।।


  # महामृत्युंजय मंत्र जपाने दूर होतात हे दोष
  > महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मंगळीक दोष, नाडी दोष, कालसर्प दोष, दृष्ट, रोग, वाईट स्वप्न, वैवाहिक जीवनातील समस्या, अपत्य बाधा आणि इतरही दोष दूर होतात.


  # मिळते दीर्घायुष्य
  > दीर्घायुष्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. भगवान शिव यांना मृत्यूचे देवता मानले जाते. हा मंत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.


  # आरोग्य प्राप्ती
  > हा मंत्र आजारपणापासून रक्षण करतो. शरीर निरोगी राहते आणि त्वचा उजळ होते.


  # यश (सन्मान) प्राप्ती
  > या मंत्राचा जप केल्याने भक्ताला समाजात उच्च स्थान प्राप्त होते आणि सन्मान मिळतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंत्र जपाने होणारे इतर दोन खास फायदे...

 • importance of mahamrityunjay mantra for better health

  # धन-संपत्तीची प्राप्ती 
  > जो व्यक्ती धन-संपत्तीची इच्छा ठेवतो, त्याने महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य करावा. या मंत्र जपाने महादेव प्रसन्न राहतात.

 • importance of mahamrityunjay mantra for better health

  # अपत्य प्राप्ती
  > महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास महादेवाची विशेष कृपा राहते आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास अपत्य सुख प्राप्त होऊ शकते.

Trending