आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवनाचे रहस्य : मनात क्रोध, अहंकार जोपर्यंत असेल तोपर्यंत जीवनात सुख मिळत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क - पौराणिक लोक कथेनुसार एक व्यापाऱ्याकडे खूप धन-संपत्ती होती. पण त्याच्या मनाला शांती नव्हती. तो दरवेळी तणावात राहत असे. एकेदिवशी तो दुसऱ्या गावाहून आपल्या गावी परतत होता. वाटेत त्याला एक आश्रम दिसले. तो त्या आश्रमात गेला. तेथे त्याला एक साधू दिसले. व्यापाराने साधूला नमस्कार केला आणि आपली व्यथा मांडली. 

 

> साधू म्हणाले तू काही वेळ येथे बसून ध्यान कर. व्यक्ती ध्यान करण्याचा प्रयत्न केला पण तो ध्यानस्थ होऊ शकत नव्हता. त्याच्या मनात इकडचे-तिकडचे विचार फिरत होते. व्यक्तीने साधूला सांगितले की, तो ध्यान-धारणा करू शकत नाही. 

> साधू म्हणाले, ठीक आहे ये माझ्यासोबत. काही वेळ आश्रमात फिरू. व्यक्ती साधूसोबत निघाला. आश्रमात फिरताना व्यक्ती एका झाडाला हात लावत होता. तेवढ्यात त्याच्या हातात एक काटा टोचला. यामुळे व्यक्तील वेदना होत होत्या. साधूने आश्रमातून लेप आणून व्यक्तीच्या हाताला लावला. साधू त्याला म्हणाले, ज्याप्रकारे हा काटा टोचल्यामुळे तुला वेदना होत आहेत, अगदी त्याचप्रमाणे तुझ्या मनात क्रोध, अहंकरा, ईर्ष्या, लालच यांसारखे काटे टोचत आहेत. जोपर्यंत तू या काट्यांना बाहेर काढणार नाही, तोपर्यंत तुला मनःशांती मिळणार नाही. व्यक्तीला साधूचे म्हणणे समजले आणि तो त्यांचा शिष्य झाला. यानंतर त्याने हळू-हळू आपल्या या वाईट गोष्टींना दूर केले. 

 

कथेची शिकवण
> या कथेतून आपल्या अशी शिकवण मिळते की, आपल्याला मनःशांती हवी असेल तर सर्वात अगोदर वाईट गोष्टी दूर केल्या पाहिजे. क्रोध, अहंकार, लालच यांसारख्या गोष्टींमुळे मनःशांती मिळत नाही. यांमुळे आपण सतत विचार करत असतो. यामुळे आपल्याला यांपासून दूर राहिले पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...