आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेमध्ये देवाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा, यामुळे मिळते सकारात्मक ऊर्जा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार देवाचे विविध रूपं सांगण्यात असून सर्व देवी-देवतांचे पूजन करण्याचे विधी, नियम वेगवेगळे आहेत. पूजा पद्धतींमध्ये देवाच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व आहे. मंदिरात गेल्यानंतर देवाला अवश्य प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घातल्याने विविध चमत्कारिक लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, प्रदक्षिणा संबंधित काही खास गोष्टी.

का घातली जाते प्रदक्षिणा ?
पूजा झाल्यानंतर देवाच्या मूर्तीजवळ सकारत्मक उर्जा तयार होते. ती उर्जा ग्रहण करण्यासाठी देवला प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात सदैव मंत्र उच्चार सुरु असतात आणि त्यामुळे मंदिरातील वातावरणामध्ये सकारत्मक उर्जेचा प्रभाव असतो. सकारत्मक ऊर्जेमुळे मन आणि वातावरणाची शुद्धी होते. या कारणांमुळे देवाला प्रदक्षिणा घातली जाते.

प्रदक्षिणा सदैव हाताच्या उजव्या बाजूने सुरु करावी
नेहमी लक्षात ठेवावे की, प्रदक्षिणा सदैव हाताच्या उजव्या बाजूने सुरु करावी, कारण दैवी शक्तीच्या आभामंडलाची गती दक्षिणावर्ती असते. डाव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास दैवी शक्तीच्या ज्योतिर्मंडलाची गती आणि आपल्या शरीरामधील विद्यमान दिव्य अणूंमध्ये विरोध निर्माण होतो, ज्यामुळे आपले तेज नष्ट होऊ शकते. याउलट हाताच्या उजव्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यास वातावरणातील सकारात्मक उर्जा सहजरीत्या प्राप्त होते.

कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात
- श्रीगणेशाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात. यामुळे श्रीगणेश भक्ताला रिद्धी-सिद्धी सहित समृद्धीचा वर देतात.
- महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तावर प्रसन्न होतात.
- देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते. देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते.
- भगवान नारायण अर्थात् विष्णूदेवाला चार प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
- एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
- श्रीरामाचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे.

हे पण लक्षात ठेवा...
- प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबू नये.
- प्रदक्षिणा जेथून सुरु केली तेथेच समाप्त करावी. प्रदक्षिणा सुरु केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही.
- प्रदक्षिणा घालताना बोलू नये.
- ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवाचे स्मरण करावे.