आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, पूजेपूर्वी संकल्प का घेतला जातो?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये पूजा करण्याचे विविध प्रकार आणि नियम सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार योग्य विधीनुसार पूजन केल्यास त्याचे फळ लवकर प्राप्त होते. यामुळे घरामध्ये एखाद्या विशेष पूजेचे आयोजन केल्यास धर्म-कर्म ज्ञानी विद्वानाला पूजेसाठी बोलावले जाते. ठीक अशाचप्रकारे आपणही दररोजच्या सामान्य पूजेमध्ये काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार संकल्पशी संबंधित काही खास गोष्टी...


> शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही.


> मान्यतेनुसार, संकल्प न घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ इंद्रदेवाला प्राप्त होते. यामुळे दररोजच्या पुजेमध्येही पहिले संकल्प घ्यावा आणि नंतरच पूजा करावी.


संकल्प घेण्याचा अर्थ 
> शास्त्रानुसार घेण्याचा अर्थ असा आहे की, आपण कुलदेवतेला आणि स्वतःला साक्षी ठेऊन अशी प्रतिज्ञा करतो, की मी हे पूजन कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल.

बातम्या आणखी आहेत...