आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनो...सुरु करा अभ्यास; 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला होतील परीक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  निवडणुकांच्या धामधुमीत 10 वी आणि 12 वीचे वेळापत्रक आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 पर्यंत असेल, तर दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान असेल. दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने 'mahahsscboard.in' या आपल्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट केले आहेत. यंदा 4 महिने आधीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असल्याचेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी म्हटले आहे.
डॉ. अशोक भोसले म्हणाले की, "हे संभाव्य वेळापत्रक असेल. छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना नंतर देण्यात येईल. तसेच, सोशल मीडियावरून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये", असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...