आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 डिसेंबरनंतर बंद होणार हे चेकबुक; SBI बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)चे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही नॉन सीटीएस चेक वापरत असाल तर 12 डिसेंबरआधी बँकेत जाऊन ते चेकबुक बदलून घ्या. एसबीआय बँकेच्या अहवालानुसार 12 डिसेंबरपर्यंत बँकेचे जुने चेकबुक बंद होणार आहे. तेव्हा आजच बँकेत जाऊन जुने चेकबुक बदलून घ्या. तीन महिन्यांआधी भारतीय रीझर्व बँकेने नॉन सीटीएस चेकसाठी काही नियम जाहीर केले होते. त्यानुसार, 1 जानेवारीपासून कोणत्याही बँकेत नॉन सीटीएस चेकने व्यव्हार करता येणार नाही.

 

त्यामुळे 12 डिसेंबरनंतर एसबीआय बँक खातेधारकांना सीटीएस चेकने व्यव्हार करणे बंधनकारक आहे. तर इतर बँकेमध्ये हा नियम 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहे. एसबीआय बँक सतत आपल्या बँकिंग सिस्टिममध्ये बदल करत आहे त्यामुळे बँकेने आपल्या अनेक सुविधा बंद केल्या आहे.

 

काय आहे 'सीटीएस'?

'सीटीएस'चा अर्थ चेक ट्रांझेक्शन सिस्टिम असा आहे. या सिस्टिममध्ये चेकची इलेक्ट्रॉनिक इमेज तयार होते. त्यामुळे या चेकची प्रत दुसऱ्या बँकेत पाठवणे शक्य होणार आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा, इतर कोणत्या बँका हा नियम लागू करणार आहे?

बातम्या आणखी आहेत...