Home | National | Other State | important rights of a bank customer

बँकमध्ये दुपारी 1 वाजता जा किंवा 2:30 वाजता, कोणतीही बँक lunch break चे कारण देवू शकत नाही, वाचा हे आहेत नियम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 02:24 PM IST

या प्रकरणात तर आपल्याला बँकेकडून मोबदला मिळण्याचा अधिकार आहे,केवळ नियम माहिती असावा

 • important rights of a bank customer

  युटिलिटी डेस्क- बॅंकेसाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा आहे. तो बॅंकेच्या वेळेत केव्हाही येवू शकतो. बॅंक अधिकारी त्याला लंच टाईम, असल्याचे सांगून त्याला टाळू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने RTI च्या माध्यमातून बँकेशी निघडीत प्रश्नांची उत्तरे रिझर्व्ह बँंक ऑफ इंडियाकडे मागितली होती.

  उत्तराखंड हल्दवानीचे उद्योजक प्रमोद गोल्डी यांनी RBI कडे माहितीच्या अधिकाराखाली काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

  जेवणाची वेळ सांगून कामे बंद करतात व टाळाटाळ करतात..

  - सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनाथांबता सेवा देणे बँक अधिकार्‍यांकडून अपेक्षित आहे. अधिकारी बदलून त्या जागी दुसरा अधिकारी नेमून जेवणासाठी जावू शकतात. पैशाची देवाण घेवाण त्यावेळी सुरु असावी.

  - आपण पाहतो बऱ्याचदा बँकांमध्ये lunch break नावाचे फलक लावले जातात. त्या वेळेत ग्राहक lunch break होईपर्यंत बराच वेळ ताटकळत असतात. हे नियमबाहय आहे.

  - जेवणाची वेळ सांगून gate बंद नाही करू शकत बँकेचे कर्मचारी. ग्राहकांना ताटकळत देखील नाही ठेऊ शकत.

  - काऊंटरवर ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमी कोणीतरी असावे.

  - 1111 किंवा 2222 अशा स्वरूपातील रक्कम बँक ठेवीमध्ये जमा करण्यास कोणतीही बँक नकार देवू शकत नाही. ठेवी स्विकारण्यासंबंधित अशा कुठल्याही मार्गदर्शक बाबी नाहीत.

  ग्राहकांना बँकांमध्ये हे अधिकार का मिळतात?
  - चेक स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारचा विलंब झाल्यास ग्राहकांना बँकेकडून भरपाई मिळण्याचा अधिकार आहे.

  - ग्राहकाच्या खात्यातून अनाधिकृत व्यवहारांसाठी बँक ग्राहकांना जबाबदार ठरवू शकत नाही.

  - कायमस्वरूपी पत्ता असल्याशिवाय खाते उघडता येणार नाही असे कोणतीही बँक सांगू शकत नाही.

  - ग्राहकांची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवने ही बँकेची जबाबदारी आहे. बँकेला इतर कोणत्याही व्यक्तीला त्यासंदर्भात माहिती देता येत नाही.

Trending