• Home
  • News
  • Imran Hashmi's movie 'The Body', will released on December 13, inspired by the Spanish thriller Story

अपकमिंग / 13 डिसेंबरला रिलीज होत आहे इम्रान हाश्मीचा चित्रपट 'द बॉडी', स्पॅनिश थ्रिलरने प्रेरित आहे कथा 

ऋषी कपूर चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 04:38:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : इम्रान हाश्मीने आपला आगामी चित्रपट 'द बॉडी' च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरपूर हा चित्रपट 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाशी निगडित फोटो शेअर करून याची माहिती दिली. चित्रपटात ऋषी कपूर, शोभिता धुलीपाला मुख्य भूमिकेत आहेत.

मोहनलाल स्टारर 'दृश्यम' चे दिग्दर्शन करणारा जीतू जोसेफ 'द बॉडी' ने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. स्पॅनिश थ्रिलर चित्रपटाने प्रेरित हा चित्रपट अजूर एंटरटेन्मेंटने प्रोड्युस केला आहे. चित्रपटाच्या कथेनुसार इम्रान हाश्मी एका अशा पतीची भूमिका साकारत आहे, जो आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेत आहे. तसेच ऋषी कपूर यामध्ये पोलिसाच्या भूमिकेत आहेत.

X
COMMENT