आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या मुलाला कणखर बनवण्यासाठी इम्रान हाश्मीने काढला होता एक उपाय, पत्नीसोबत स्वतःदेखील \'हे\' पदार्थ खाणे सोडले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 40 वर्षांच्या इम्रान हाश्मीची बॉलिवूडमध्ये सीरियल Kisser अशी ओळख आहे. तुम्हाला माहित आहे का की, फिल्मी जगतातील हा बेड बॉय खऱ्या आयुष्यात एक खूप चांगला पिता आणि पती आहे. तो मुलाच्या कॅन्सरशी बॅटमॅन बनून लढला आणि मुलाला आजाराशी दोन हात करण्यासाठी कणखर बनवत राहिला. त्याने मुलाला सुपरहिरो बनून एका गेमविषयी सांगितले आणि म्हणाला जर तो हा गेम जिंकला तर आयरमॅनसारखे तो 'अयान-मॅन' होईल. त्यानंतर अयान गेमसाठी लगेच तयार झाला. मग त्यापुढे जेव्हा केव्हा ट्रीटमेंटसाठी गरज पडली तेव्हा इम्रान सुपरहीरो बनून मुलाला त्यासाठी तयार करायचा.   

मुलाच्या आजारामुळे जंक फूड खाणे सोडले...
इम्रान हाश्मी आणि त्याची पत्नी परवीन यांचा मुलगा अयानच्या किडनीमध्ये ट्यूमर डिडेक्ट झाला होता. त्यामुळे त्याच्यासाठी शुगर हेवी जंक फूड खूप नुकसान कारक होते. म्हणून इम्रान आणि त्याच्या पत्नीने शुगर हेवी जंक फूड खाणे सोडले होते आणि सर्व लोकांना सल्ला दिला होता की, 'शुगर हेवी फूडला नाही म्हणा'. इम्रानने या सर्व गोष्टी आपले पुस्तक 'द किस ऑफ लाइफ' मध्ये लिहिल्या आहेत. या पुस्तकात त्याने एका पित्याचे दुःख मांडले आहे. 

पहिला सीन शूट करण्यासाठी घेतले होते 45 टेक... 
इम्रान हाश्मीला अभ्यास करायला बिलकुल आवडत नव्हते. इम्रानने आपल्या पुस्तकात सांगितले आहे की, तो परीक्षेच्या काळात यामुळे अभ्यास कार्याचा की, त्याला नंतर परत परीक्षा द्यायला लागू नये. त्याने लहानपणीच अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते, पण त्याचे ध्येय अभिनेता बनणे नव्हते. नंतर विक्रम भट्टसोबत टीव्ही सीरियल 'धुंध' ने असिस्टंट म्हणून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. त्यांनतर तो विक्रमच्या फिल्म 'कसूर' मधेही असिस्टंट म्हणून होता. मात्र तो तो आपल्या डायरेक्शनच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकत नव्हता. मग त्याने विचार केला की, त्याने अभिनेता बनले पाहिजे. त्यांनतर इम्रानने पृथ्वीराज थिएटरमधून अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनतर त्याला अमीषा पटेलसोबत फिल्म 'ये जिंदगी का सफर' मध्ये कास्ट केले गेले. पण तो त्या फिल्मसाठी तयार नव्हता. मग त्याला 'फुटपाथ' साठी तयार केले गेले. यामध्ये त्याने आपला सीन शूट करण्यासाठी 44 टेक घेतले आणि मग 45 व्या टेकमध्ये क्लियर डायलॉग बोलू शकला. 

बातम्या आणखी आहेत...