आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांनी मागितली माफी, शपथविधीच्या तोंडावर नामुष्की!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शपथविधी तोंडावर आलेला असताना राष्ट्रीय निवडणूक आयोगाची माफी मागण्याची नामुष्की आेढवली. २५ जुलै रोजी इम्रान यांनी गुप्त मतदानाच्या नियमाची ऐशीतैशी करून जाहीरपणे मतदानाचा हक्क बजावला. तेव्हा अनेक समर्थकांसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. आता इम्रान खान १८ ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. 


जाहीर मतदान करणे नियमांचा भंग करणारे आहे. इम्रान यांच्याविरोधात यासंबंधी याचिका दाखल झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान यांना शपथपत्राद्वारे माफीनामा द्यावा, असा आदेश दिला होता. शुक्रवारी आयोगाच्या चारसदस्यीय पीठासमोर इम्रान यांच्या मार्फत लेखी माफीनामा देण्यात आला. निवडणूक आयोगाचे प्रमुख सरदार मोहंमद रझा अध्यक्षस्थानी होते. गुरुवारी इम्रान यांची याचिका आयोगाने फेटाळली होती. तत्पूर्वी खान यांनी खटला रद्दबातल ठरवून एनए-५३ इस्लामाबाद मतदारसंघातून विजय झाल्याचे जाहीर करण्याची विनंती करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...