आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान यांची पािकस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून निवड; शरीफ यांना ८० मतांनी केले पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- क्रिकेटमधून राजकारणात प्रवेश करणारे ६५ वर्षीय इम्रान खान यांची शुक्रवारी पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून निवड झाली. नॅशनल असेंब्लीत झालेल्या निवडणूक प्रक्रियेत पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना ८० मतांनी पराभूत केले. इम्रान यांच्या बाजूने १७६ मते पडली. ९६ सदस्यांनी शाहबाज यांना पाठिंबा दिला. 


नॅशनल असेंब्लीची सदस्य संख्या ३४२ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १७२ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. सभागृहाचे अध्यक्ष असद कैसर यांनी इम्रान यांच्या विजयाची घोषणा केली. बिलावल भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ऐनवेळी मतदान प्रक्रियेत सहभागी झाली नाही. त्यामुळे निवडणूक पूर्णपणे एकतर्फी व आैपचारिक राहिली होती. शाहबाज व पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते अयाज सादिक यांनी बिलावल यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. 


सिद्धू पाकमध्ये दाखल, म्हणाले : प्रेमाचा संदेश देण्यासाठी आलोय, शपथविधीला हजेरी लावणार 
इम्रानच्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माजी कसोटी क्रिकेटपटू व राजकीय नेता नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात दाखल झाले आहेत. पाकिस्तानात प्रेमाचा संदेश घेऊन आलाे आहे. मी भारताचा सद््भावना दूत आहे. मी राजकारणी म्हणून नव्हे, तर इम्रान यांचा मित्र या नात्याने पाकिस्तानात आलो आहे, असे सिद्धू यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...