आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला लष्करशहाने पाळलेले नाही! 22 वर्षे संघर्ष करून बनलो पंतप्रधान, अल्लाह आणि समाजाचे आभार; इम्रान यांचे पहिले भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी दिलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी अल्लाह आणि आपल्या समाजाचे आभार मानले. गेल्या 70 वर्षांपासून पाकिस्तानची जनता ज्या बदलांची प्रतीक्षा करत होती, ते बदल घडवून आणण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल धन्यवाद. ज्या लोकांनी आजपर्यंत देशाला लुटले, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या एक-एक व्यक्तीला मी सोडणार नाही. मी आश्वासन देतो, अल्लाह कसम मी आश्वासन देतो की कुठल्याही प्रकारचे एनआरओ दरोडेखोरांना आता मिळणार नाही. मला काही लष्करशहाने पाळलेले नाही. मी स्वतः 22 वर्षे संघर्ष केला आणि आपल्या पायावर उभा झालो. असे इम्रान यांनी ठणकावले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...