आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाहोर - तहरीक ए-इन्साफ पाकिस्तानचे नेते तसेच माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. 'नया पाकिस्तान' घोषणेसह निवडणुकीत प्रचार करणारे इम्रान यांचा पक्ष पीटीआय पाकिस्तानचा सर्वात मोठा पक्ष ठरला. पंतप्रधान पदी विराजमान होताच इम्रान यांच्यासमोर पाकिस्तानसाठी कर्ज उभारण्याचे मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीला पाकिस्तानच्या तिजोरीत फक्त 10 अब्ज अमेरिकन डॉलर आहेत. त्यामुळे, येत्या 12 महिन्यांत त्यांना कुठल्याही परिस्थितीत देशासाठी 25 अब्ज अमेरिकन डॉलर (1.74 लाख रुपये) कर्ज उभारावा लागणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांची घेतलेली गळाभेट आणि पीओके नेत्यांच्या शेजारी बसले. यावरून भाजपने सिद्धूंचा खरपूस समाचार घेतला तसेच काँग्रेसला धारेवर धरले.
नॅशनल असेंब्लीची सदस्य संख्या 342 आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. सभागृहाचे अध्यक्ष असद कैसर यांनी इम्रान यांच्या विजयाची घोषणा केली. बिलावल भुत्तो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ऐनवेळी मतदान प्रक्रियेत सहभागी झाली नाही. त्यामुळे निवडणूक पूर्णपणे एकतर्फी व औपचारिक राहिली होती. शाहबाज व पीएमएल-एनचे वरिष्ठ नेते अयाज सादिक यांनी बिलावल यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.
सिद्धूंची उपस्थिती... म्हणाले, प्रेमाचा संदेश देण्यासाठी आलोय
इम्रानच्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माजी कसोटी क्रिकेटपटू व राजकीय नेता नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले. पाकिस्तानात प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहे. मी भारताचा सद्भावना दूत आहे. मी राजकारणी म्हणून नव्हे, तर इम्रान यांचा मित्र या नात्याने पाकिस्तानात आलो आहे, अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी पाकिस्तानात दिली. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनाही निमंत्रण मिळाले होते. परंतु, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.