आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 नव्हे 18 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार इम्रान खान, पीटीआयची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटर इम्रान खान 11 नव्हे, तर 18 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. ते पाकिस्तानचे 21 वे पंतप्रधान ठरतील. त्यांचा पक्ष पीटीआयच्या प्रवक्त्यांनी शनिवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यासोबतच पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेंबलीचे सभापती आणि पंजाब विधानसभेचे सभापती कोण होणार त्यांच्या नावांची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. 


13 ऑगस्टला अधिकृत घोषणा
यापूर्वी इम्रान खान 11 ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेणार असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ऐनवेळी ही तारीख बदलण्यात आली आहे. सोबतच पीटीआयने राष्ट्रीय सभागृहात एकूण 180 खासदारांचा पाठिंबा मिळवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीतच विधानसभा निवडणूक सुद्धा झाली होती. परंतु, अद्याप पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाली नाही. यासंदर्भात सोमवारी पीटीआय पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेंबलीची पहिली सभा 13 ऑगस्ट रोजी भरणार आहे. त्यामध्येच खासदार आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड करतील. हेच सभापती पंतप्रधान पदासाठी पात्र ठरलेली व्यक्ती आणि त्यांचा शपथविधीची अधिकृत घोषणा करणार आहेत. उपसभापती पदासाठी पात्र ठरलेल्या व्यक्तीच्या नावाची घोषणा 15 आणि 16 ऑगस्टला केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...