आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाऱ्यांशी चांगल्या संबंधांशिवाय पाकची परिस्थिती सुधारणार नाही: पीएम म्हणून इम्रान यांचा देशाच्या नावे पहिला संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> इम्रान खान यांनी रविवारी 21 सदस्यीय कॅबिनेटची घोषणा केली.
> नवी कॅबिनेट सोमवारी राष्ट्रपती निवासस्थानी शपथ घेणार.
> इम्रान म्हणाले- पाकची दिशा बदलली नाही, तर विनाश अटळ.

 

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान खान यांनी रविवारी रात्री उशिरा राष्ट्राच्या नावे आपले पहिले भाषण दिले. त्यांनी सरकारी खर्च कमी करणे, अर्थव्यवस्था मजबूत करणे, भ्रष्टाचार, शिशु मृत्युदर, शिक्षण आणि शेजारी देशांशी चांगले संबंध यासारख्या मुद्द्यांवर संबोधन केले. परराष्ट्र धोरणावर इम्रान म्हणाले - "मी शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे म्हणालो. शांततेची आवश्यकता आहे. याशिवाय आपण पाकिस्तानची परिस्थिती सुधारू शकणार नाहीत." तथापि, इम्रान यांनी आपल्या भाषणात भारतासहित कोणत्याही शेजारी देशाचे नाव घेतले नाही. 

 

इम्रान म्हणाले की, जर पाकिस्तानची दिशा बदलली नाही, तर विनाश अटळ आहे. इम्रान यांनी देशावर 28 लाख कोटी रुपयांच्या कर्जासाठी जबाबदार मागच्या पीएमएल-एन सरकारला ठरवले. ते म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी कठीण आर्थिक स्थिती बनली आहे. सरकारला वायफळ खर्चावर रोख लावावी लागेल.

 

पाकिस्तान खूप कठीण परिस्थितीतून जात आहे: 
इम्रान म्हणाले की, आज पाकिस्तान ज्या आर्थिक अडचणींत आहे, तेवढ्या कठीण परिस्थितीत कधीच नव्हता. एकीकडे पाकिस्तान कर्जात आहे, दुसरीकडढे देशाचा मानवविकास निर्देशांक खूप घसरलेला आहे. पाकिस्तान जगातील अशा पाच देशांमध्ये आहे, जेथे दूषित पाण्यामुळे होणारे बाल मृत्यू सर्वाधिक आहेत. पोषक आहाराच्या अभावात देशात 45 टक्के मुलांचा नीट विकासही होत नाही. गर्भवती महिलांचा मृत्युदरसुद्धा अधिक आहे. या समस्या आपल्याला मिळून सोडवाव्या लागतील.

 

सरदार उस्मान पंजाबचे सीएम: 
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) उमेदवार सरदार उस्मान अहमद खान बजदर पाकिस्तानच्या पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. सरदार उस्मान यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे उमेदवार हमजा शाहबाज यांना 17 मतांनी पराभूत केले. सरदार उस्मान यांना 186 आणि हमजा यांना 159 मते मिळाली.

 

21 सदस्यीय कॅबिनेटची घोषणा, 3 महिलांचा समावेश:  
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी आपल्या 21 सदस्यीय कॅबिनेटची घोषणा केली. यात 12 सदस्य जनरल (रिटायर्ड) परवेझ मुशर्रफ यांच्या सरकारमध्ये मुख्य पदांवर होते. विदेश मंत्री पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरैशी यांना विदेश मंत्री बनवण्यात येईल. ते 2008 ते 2011 पर्यंत पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या सरकारमध्येही या पदावर राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळादरम्यान 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी कुरेशी दिल्लीत होते. कॅबिनेटमध्ये 3 महिलांचाही समावेश करण्यात आला. नवे मंत्रिमंडळ सोमवारी राष्ट्रपती निवासस्थानी शपथ घेऊ शकते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रवक्ते फवाद चौधरी यांच्या मते कॅबिनेटच्या 21 सदस्यांपैकी 16 मंत्री आणि 5 सल्लागार असतील. 

 

बातम्या आणखी आहेत...