International Special / नरेंद्र मोदींबद्दल वाईट बोलत असताना पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्याला बसला माईकमधून विजेचा झटका, व्हिडिओ व्हायरल


राशिद यांच्यावर अंडी फेकण्यात आले होते

दिव्य मराठी वेब

Aug 30,2019 10:41:11 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद अहमद यांना शुक्रवारी एक सभेत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वाईट बोलत असताना माईकमधून विजेचा झटका बसला. काश्मीरमधील नागरिकांच्या समर्थनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशभरातील लोकांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले होते. राशिददेखील एका सभेत भाषण देत होते, त्याचवेळेस त्यांच्यासोबत ही घटना घडली. करंट लागताच ते दचकले आणि त्यांनी यासाठीही नरेंद्र मोदींना जबाबदार ठरवले.


राशिद माईकवर बोलेत होते की, "मोदी आम्हाला तुमची नियत माहिती," हे बोलताच त्यांना विजेचा झटका बसला. त्यानंतर ते म्हणाले, "करंट लागला, काही होत नाही, मला वाटतं करंट आला. मोदी या सभेत अडथळा आणू शकत नाहीत." यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला.

राशिद यांच्यावर अंडी फेकण्यात आले होते
राशिद ऑग्सटमध्ये लंडन दौऱ्यावर होते. तिथे काही पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्यावर अंडी फेकली होती. नंतर लंडन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्या लोकांनी एक व्हिडिओ जारी करुन इम्रान सरकार लोकांवर अन्याय करत असल्याचे म्हणले होते.


भारतीय युजर्स उडवत आहेत खिल्ली
हा व्हिडिओ व्हायरल होताय भारतीय युजर्स रशिद यांची खिल्ली उडवत आहेत. युजर्स म्हणत आहेत की, मोदींच्या नावानेच यांचे हे हाल झाले, ते समोर आल्यावर काय होईल...?

X
COMMENT