आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला इम्तियाज जलील यांची दांडी; सोशल मीडियावर होत आहे टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण आज औरंगाबादेत पार पाडले. दरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ध्वजारोहण सोहळ्याला दांडी मारली. मागील चार वर्षे आमदार असताना आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही जलील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. खासदार इम्तियाज जलील सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे.  
 

जलील यांनी व्यक्त केला संताप 
दरम्यान माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरून कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करू नये, असे विचार करणाऱ्यांची मानसिकता दिसून येते. मला अशा लोकांकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी आपला संताप व्यक्त केला.  
 

 

आमदार असताना देखील जलील यांची 4 वर्षे कार्यक्रमाला होती अनुपस्थिती 
आज मराठवाडा मु्क्तीसंग्राम दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांची उपस्थिती अपेक्षित असते. मात्र औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवली. जलील यांनी आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात देखील या सोहळ्याला गैरहजर राहिले होते. यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.