आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की, एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील मध्य मतदार संघात शांततेत मतदान सुरू होतं. यावेळी कटकटगेट जवळील महापालिकेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्राबाहेर एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर इम्तियाज जलील आणि कदीर मौलाना हे देखील आमने सामने आले. यावेळी इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.माझ्यासोबत धक्काबुक्की झालेली नाहीये- इम्तियाज जलील


दरम्यान, या सर्व प्रकारानंतर इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रीया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी लिहीले की, "माझ्यासोबत कसल्याच प्रकारची धक्काबुक्की झालेली नाहीये. आम्ही सर्व ठीक आहोत. हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले मुस्लिम मत कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत."

बातम्या आणखी आहेत...