आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 100 Years Delhi Is Ahead Of 1 Celsius ! In Five Cities Of Rajasthan, Temperature Dropped, Dras Is At Minus 20 Degrees

100 वर्षांत दिल्लीत पारा 1 अंशाच्या पुढे ! राजस्थानच्या पाच शहरांत पारा नीचांकी, द्रास उणे 20 अंशांवर

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
बर्फाळ वाळवंट : छायाचित्र राजस्थानच्या झंझुनूच्या खेतडी गावचे आहे. शनिवारी संपूर्ण शेतात बर्फच बर्फ झाला. छायाचित्र : रमेश छेजरा - Divya Marathi
बर्फाळ वाळवंट : छायाचित्र राजस्थानच्या झंझुनूच्या खेतडी गावचे आहे. शनिवारी संपूर्ण शेतात बर्फच बर्फ झाला. छायाचित्र : रमेश छेजरा

नवी दिल्ली / जयपूर /लखनऊ : देशातील उत्तर तसेच पूर्वेकडील प्रदेशांत थंडीची लाट आली आहे. राजस्थानच्या ५ शहरांत तापमान शून्याहून खाली घसरले. पंजाब, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत हुडहुडी भरली आहे. दिल्लीत शनिवारी सकाळी सरासरी १.७ अंश तापमानाची नोंद झाली. दिल्लीत हा दहा वर्षांतील सर्वात गारठवणारा डिसेंबर ठरल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. द्रासमध्ये पारा उणे २० अंशांवर नोंदवण्यात आला. डिसेंबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ७ सिव्हियर कोल्ड डे व ८ कोल्ड डेची नोंद झाली आहे. राजस्थानच्या शेखावटीमध्ये पारा उणे ४ अंशांवर, तर सिकरमध्ये उणे १ अंशावर आला होता. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शनिवारी पारा ५.३ अंश नोंदवण्यात आला. सरासरीपेक्षा पाच अंशांनी तो कमी आहे. या ऋतूमध्ये भोपाळचे हे सर्वात किमान तापमान आहे. डोंगरात वसलेल्या पंचमढीमध्ये किमान तापमान १.२ अंश होते. दिल्लीत १९९७ नंतर पहिल्यांदाच सलग ११ व्या दिवशी भीषण थंडी पडली. १७ डिसेंबरचा अपवाद वगळल्यास दिवसाचे तापमान १६ अंशांपेक्षा जास्त झाले नाही. हिमाचलच्या केलाँगमध्ये उणे ११.५ होते. उत्तराखंडच्या केदारनाथ व बद्रिनाथमध्ये बर्फच बर्फ आहे. पिथोरगडमध्ये पारा ५ अंश होता. उत्तर प्रदेशच्या मथुरेत २ अंश, हरियाणाच्या हिसारमध्ये ०.२ अंश, पंजाबच्या बठिंडा २.३ अंश तापमान नोंदवले गेले.

सिक्कीम : १७०० पर्यटकांना लष्कराने काढले

सिक्कीमच्या नाथू-ला जवळ बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या १५०० पर्यटकांना सैन्याने सुरक्षित काढले. हे पर्यटक सुमारे ३०० टॅक्सींतून आले होते. नाथू ला येथून परतत असताना त्यांचा मार्ग बंद झाला होता. लष्कराने त्यांच्यासाठी विशेष अभियान राबवले होते. त्यात यश मिळाले.

फटका : १९४ रेल्वे विलंबाने, ७१ गाड्यांचे मार्ग बदलले, ६६ रद्द, ४ हवाई मार्ग बदलले

दिल्ली विमानतळावर दृश्यमानता कमी झाल्याने चार विमानांची दिशा बदलावी लागली. देशभरात १९४ रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या, तर ७१ गाड्यांचा मार्ग बदलावा लागला. त्यात दुरंतो, राजधानीसह सुपरफास्ट गाड्यांचा समावेश आहे. ६६ गाड्या रद्द झाल्या. धुक्यामुळेच ११ गाड्यांच्या वेळा बदलाव्या लागल्या. स्पाइसजेटने यात्रेकरूंना अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार दिल्ली, पाटणा, गुवाहाटी, वाराणसी व ग्वाल्हेरचे हवामान खराब असून उड्डाणांवरही परिणाम होऊ शकतो. २०डिसेंबर पासून ७५० हून जास्त उड्डाणांना विलंब झाला. १९ रद्द झाले.

त्रस्त : प्रदूषणात वाढ, १८ राज्यांत दाट धुके, १० राज्यांत दृश्यमानता २५ मीटरहून कमी

दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर वाढण्यास सुरुवात झाली असून ३० डिसेंबरपर्यंत स्थिती अशीच राहू शकते. २९ व ३० डिसेंबरपर्यंत प्रदूषणाची स्थिती गंभीर राहील. त्यामुळे एक्यूआयमध्ये काही अंशी सुधारणा होईल. परंतु, स्थिती वाईट राहील. १ जानेवारीला प्रदूषणाची स्थिती आणखी वाईट होईल. थंडी व प्रदूषणामुळे १८ राज्यांत दाट धुके पसरले आहे. दुसरीकडे दृश्यमानतेतही कमतरता दिसून आली. १० राज्यांत शनिवारी दृश्यमानता २५ मीटरपेक्षा कमी होती.

पुढे काय : बिहारच्या ३८ जिल्ह्यांत यलो वॉर्निंग दिल्लीत सातत्याने पारा घसरत असल्याने व थंडीची लाट असल्यामुळे हवामान विभागाने रेड वॉर्निंग जारी करण्यात आले. ३१ डिसेंबरपासून दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

बिहारमध्ये पाटण्यासह ३८ जिल्ह्यांसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहे. छत्तीसगडच्या १५ जिल्ह्यांत ४८ तासांसाठी थंडीची कडाक्याची लाटा वाहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

हरियाणा-पंजाबमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये १ आणि २ जानेवारी रोजी बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे उत्तरेतील गारठा वाढेल. 

बातम्या आणखी आहेत...