आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 16 Years, Price Of Gold Has Been Increased More Than Six Parent, Giving 7 Times The Sensex

16 वर्षात साेन्याच्या किंमतीत सहापटीपेक्षा जास्त वाढ, सेन्सेक्सने दिला 7 पट परतावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : या वर्षी धनत्रयाेदशी २५ अाॅक्टाेबरला येत अाहे. त्यासाठी अाता खूप कमी दिवस बाकी अाहेत. या शुभमुहूर्तावर लाखाे भारतीय व्यक्तिगत उपयाेगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी साेन्याची खरेदी करतात. गेल्या १६ वर्षांचा विचार केला तर साेन्याच्या किमतीमध्ये सहापटीपेक्षा जास्त वाढ झाली अाहे. वर्ष २००४ मध्ये साेन्याची किंमत ५,८५० रुपये प्रती १० ग्रॅम हाेती. अाता ती वाढून ३९,००० रुपयांच्या अासपास अाहे. हा विचार केला तर जर एखाद्या व्यक्तीने २००४ मध्ये १.५ लाख रुपये साेन्यामध्ये गुंतवले असतील तर त्या काळी त्याने २५६.४ ग्रॅम साेने खरेदी केले असेल. अाज हे २५६.४ ग्रॅम साेने विकले तर १० लाख रुपयांपेक्षा जास्त मिळू शकतात. गेल्या महिन्यात प्रती १० ग्रॅम साेन्याची किंमत ४०,००० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली हाेती. गुरुवारी सणासुदीच्या मागणीमुळे दिल्लीत साेन्याची किंमत १०५ रुपयांनी कमी हाेऊन प्रती १० ग्रॅमसाठी ३८,९८५ रुपयांवर अाली.गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांचा विचार केला तर या काळात बीएसई सेन्सेक्सने ७.९२ टक्के परतावा दिला अाहे. परंतु शेअर्समधील गुंतवणुकीबराेबर बाजारातील जाेखीम असते. पारंपरिक गुंतवणूकदार साेन्याकडे जास्त अाकर्षित हाेतात. कारण त्यांना अन्य पर्यायांच्या तुलनेत साेन्यातील सुरक्षा, लिक्विडिटीबराेबरच चांगला परतावा मिळण्याचा विश्वास जास्त असताे. गेल्या १६ वर्षांतील अनुभव बघितला तर परतावा देण्यामध्ये साेन्याने चांगली कामगिरी केली अाहे. एका ठरावीक कालावधीनंतर महागाईवर मात करण्याची साेन्याची क्षमता असते. त्याच्या किमतीमध्ये महागाईच्या दराने वाढ हाेते. दुसरी गाेष्ट अापल्या गुंतवणूक पाेर्टफाेलिअाेतील शेअर्सच्या गुंतवणुकीचा समताेल साधण्यासाठी साेन्यात गुंतवणूक करणे चांगले समजले जाते.


जाेखीम कमी, गुंतवणुकीची चांगली संधी
कशी कराल साेन्यात गुंतव
णूक
एखादी व्यक्ती प्रत्यक्ष वा गाेल्ड ईटीएफ, गाेल्ड फंडाच्या रूपाने साेन्याची खरेदी करू शकते. त्याशिवाय घरात विनाकारण पडून असलेले साेने सरकारच्या गाेल्ड माेनेटायझेशन याेजनेत जमा करू शकतात. हे साेन्याचे फिक्स्ड डिपाॅझिट करण्यासारखे अाहे. या याेजनेंतर्गत व्यक्तीला जमा साेन्यावर व्याजरूपाने कमाई हाेते.

गोल्ड माेनेटायझेशनची मुदत काय ?
साेन्यातील बचत खात्याचा किमान लाॅक इन कालावधी १ वर्ष अाहे.तुम्ही खाली िदलेल्या पर्यायातून निवड करू शकता :
* लहान कालावधी : १ वर्ष ते ३ वर्षे
* मध्यम कालावधी : ५ वर्षे ते ७ वर्षे
* जास्त कालावधी : १२ वर्षे ते १५ वर्षे


गोल्ड माेनेटायझेशन ​​​
​​​​स्कीम
गाेेल्ड माेनेटायझेशन याेजना वर्ष २०१५ मध्ये सुरू करण्यात अाली हाेती. त्या वेळी देशात लाेकांच्या घरात २० हजार टनांपेक्षा जास्त साेने पडून असल्याचा अंदाज हाेता. याेजनेचा उद्देश साेने माेनेटाइज करून अर्थव्यवस्थेत अाणणे, जेणे करून साेन्याची मागणी पूर्ण हाेईल. साेने अायातीवरील अवलंबित्व कमी करणे हाेता.

किमान ठेव मर्यादा किती अाहे ?
तुम्ही केवळ ३० ग्रॅम साेने जमा करून खाते उघडू शकता. ठेवीसाठी काेणतीही कमाल मर्यादा नाही.
 

बातम्या आणखी आहेत...