आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2030 पर्यंत भारतातील 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जाणार, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात 2030 पर्यंत जवळपास 3 कोटी 40 लाख नागरिकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागणार आहेत. "ग्लोबल वॉर्मिंग" यामागील प्रमुख कारण असेल, असा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना(ILO)ने दिला आहे.


आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केलेल्या अहवालात जगभरात किती नोकऱ्या जाणार याची आकडेवारी दिली आहे. ‘वर्किंग ऑन अ वार्मर प्लेनेट: द इंपेक्ट ऑफ हीट स्ट्रेस ऑन लेबर प्रॉडक्टिविटी अँड डिसेंट वर्क’ असे या अहवालाचे नाव आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे  जगभरात जवळपास 8 कोटी लोकांच्या नोकऱ्या जातील आणि यात एकट्या भारतात 3 कोटी 40 लाख नोकऱ्या जातील.

 

जागतिक स्तरावर तापमानात होणाऱ्या वाढीमुळे नागरिकांच्या शारीरिक क्षमता कमी होतील. वातावरणात 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आणि अधिक आद्रता असल्याने शारीरिक अशक्तपणा वाढेल, काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होईल, असे यात नमुद करण्यात आले आहे. याच संस्थेने या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सिअस वाढ होईल, असेही सांगण्यात आले होते.


अहवालात सांगण्यात आले आहे की,"तापमान वाढल्याने 2030 पर्यंत कामाच्या वेळेत सरासरी 2.2 टक्के घट होईल, म्हणजेच 8 कोटी नागरिकांच्या पूर्णवेळ नोकऱ्या जातील. यामुळे सरासरी 2,400 बिलिअन डॉलरचे जागतिक नुकसान होईल. भारतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2030 पर्यंत सरासरी 5.8 टक्के कामाच्या वेळेत घट होईल म्हणजेच 3 कोटी 40 लाख नागरिकांच्या नोकऱ्या जातील."