आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2030 मध्ये 420 लाख कोटी रुपयांची होईल भारताची ग्राहक बाजारपेठ, तिसरी सर्वात मोठी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत २०३० पर्यंत जगात तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ होईल. सध्या भारतात वार्षिक ग्राहक खर्च १०५ लाख कोटी रुपये आहे. हे २०३० मध्ये ४२० लाख कोटी रुपये होईल. अमेरिका व चीनची बाजारपेठ भारतापेक्षा मोठी होईल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एका अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. फोरमने गेल्या वर्षी चीनच्या ग्राहक बाजाराचे आकलन केले होते, त्यात २०२७ मध्ये ५७४ लाख कोटी रुपयांची होईल,असे म्हटले आहे. अमेरिकेच्या बाजाराचा आढावा यात घेतला नाही. मात्र, तो सर्वात मोठा असेल. विक्री श्रीमंत, दाट लोकसंख्येची शहरे व हजारो विकसित भागात होईल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने बेन अँड कंपनीसोबत मिळून हा अहवाल तयार केला . यासाठी ३० शहरांतील ५१०० घरांचे सर्वेक्षण केले. ४० कंपन्यांच्या प्रमुखांनी चर्चा केली. 

 

एकूण खर्चात ७५% भागीदारी मध्य उत्पन्न वर्गाची 
-सध्या ५०% लोक मध्यम उत्पन्नाचे. २०३० मध्ये ८०% होतील. त्यांची खर्चात ७५% भागीदारी.

-जीडीपीमध्ये ६०% देशांतर्गत खासगी खर्च आहे. 
-भारत जगातील सर्वात युवा देशांत असेल. येथे १०० कोटींपेक्षा इंटरनेट यूजर असतील. २.५ कोटी लोक दारिद्र्य रेषेवर येतील. 

 

खाण्यापिण्याचा खर्च दुप्पट, सेवांवर तिप्पट वाढेल 
२०३० पर्यंत १४ कोटी लोक मध्यम वर्गात समाविष्ट असतील. हे लोक खाणेपिणे, कपडे, वैयक्तिक निगा, गॅजेट, वाहतूक व हाउसिंगवर दोन ते अडीच पट जास्त खर्च करतील. आरोग्य, शिक्षण व मनोरंजनसारख्या सेवांवर हा खर्च ३ ते ४ पट वाढेल. 

 

परचेसिंग पॉवर : भारत २०३० मध्ये दुसरी मोठी अर्थव्यवस्था 
परचेसिंग पॉवर अर्थात रुपयाच्या खरेदी क्षमतेच्या हिशेबाने भारत २०३० मध्ये जगात दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. त्यावेळी देशाचे जीडीपी ३,२४१ लाख कोटी रुपये होईल. 

 

२०२१ पर्यंत वाढणारी अर्थव्यवस्था साध्य करेल भारत 
जागतिक बँकेने सन २०२१ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरणीचा अंदाज जाहीर केला आहे. मात्र, बँकेने भारताचा विकास दर वाढून ७.५ टक्क्यांवर पोहोचला व आपला देश जगात तेजीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल, असे सुखावह चित्र समोर आणले आहे. जागतिक बँकेच्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स' अहवालात म्हटले की, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धिदर आर्थिक वर्ष २०१७ च्या ६.७ टक्क्यांनी वाढून २०१८ मध्ये ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तो २०१९, २०२० व २०२१ मध्ये ७.५ टक्के कायम राहण्याचा अंदाज जारी केला आहे. या पद्धतीने भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होईल.

 

पायाभूत सुविधांमुळे बदलते चित्र :

सरकारच्या पायाभूत सुविधा विकासातील कामाचे अहवालात कौतुक केले आहे. त्यात म्हटले की, आता त्यांचे निष्कर्ष समोर येत आहेत. भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ७.३% राहण्याचा अंदाज असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच केलेल्या धोरणात्मक सुधारणांचे लाभ दिसू लागले आहेत, कर्जाची मागणीही वाढत आहे. मात्र, त्याचबरोबर आगामी काळात द. आशियात निवडणुका असल्यामुळे अनिश्चितता वाढू शकते,असा इशाराही दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...