आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In 5 Years, Gurugram, Noida Houses Become Cheaper, More Expensive In Hyderabad; Trend For Big City Properties Over The Last 5 Years

५ वर्षांत गुरुग्राम, नोएडामध्ये घरे झाली स्वस्त, हैदराबादेत महाग; गेल्या ५ वर्षांतील मोठ्या शहरांतील मालमत्तांचा ट्रेंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मरगळ : अहमदाबाद, चेन्नई आणि पुण्यात २-४% वाढ
  • किमतीतील घसरणीचे कारण, प्रकल्प विलंब व मोठ्या ग्रुपमध्ये दिवाळखोरीची कारवाई
  • मुंबईत मालमत्तेचे सरासरी मूल्य १५% वाढून ९,४४६ रुपये चौरस फूट झाले

नवी दिल्ली - गेल्या पाच वर्षांदरम्यान गुरुग्राममध्ये ७ टक्के आणि नोएडामध्ये निवासी मालमत्तांच्या किमतीत ४ टक्क्यांची घसरण नोंदली आहे. दक्षिण भारतातील शहरांची स्थिती चांगली आहे. हैदराबादमध्ये २०१५ पासून आतापर्यंत घरांच्या किमतीत ४० टक्क्यांनी उसळल्या आहेत. हे निरीक्षण रियल्टी पोर्टल प्रॉपटायगरने नोंदवले आहे. प्रॉपटायगरच्या अहवालानुसार, नोएडा व गुरुग्राममध्ये निवासी प्रकल्पात विलंब आणि मोठ्या विकासक दिवाळखोर झाल्याने लोकांचा मालमत्तेवरील विश्वास घटला आहे. दक्षिण भारतीय शहरांत जास्त मागणीमुळे रिअल इस्टेट सेक्टर व्यवस्थित आहे. अहवालानुसार, दिल्लीनजीक हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सरासरी किमती मार्च २०१५ मध्येे प्रचलित दरांपेक्षा ७ टक्के घटून ५,२३६ रु. प्रति चौ. फूट राहिली आहे. याच पद्धतीने उत्तर प्रदेशच्या नोएडात ३,९२२ रु. प्रति चौ. फुटांपर्यंत किमती राहिल्या. प्रॉपटायगरने सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भारताने बहुतांश प्रमुख निवासी बाजारांत संपत्तीच्या मूल्यात घट दिसून आली. दीर्घकाळापर्यंत मागणीतील घसरणीनंतर मालमत्तेत अद्यापही लोकांचे आकर्षण आहे. तेलंगण राज्यातील बांधकामामुळे हैदराबादमध्ये जास्त वाढल्या किमती
 
हाउसिंग डॉट कॉम आणि प्रॉपटायगरचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, भारताच्या रिअल इस्टेट बाजारातील निवासी मालमत्तांच्या भावात घट नोंदली आहे. हैदराबाद अपवादात्मक स्थितीत 
समोर आले आहे. याचे कारण, २०१५ मध्ये येथे मालमत्तेचा भाव खूप कमी होता. एवढेच नव्हे तर राज्याचे विभाजन होऊन नवीन तेलंगणाची निर्मिती हेही एक कारण आहे.मालमत्ता तज्ञ मनोजसिंह
 मीक म्हणाले, नोटबंदी,जीएसटी आणि रेरामुळे मालमत्ता बाजारपेठ सुधारणेच्या टप्प्यात होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत किमतीत चढ-उतार झाला नसल्याचे समारे आले.
 

बंगळुरूत किंमत ११% वाढून ५१९४ चौ.फूट


असे असले तरी हैदराबादमध्ये घराचे सरासरी मूल्य ४० टक्के वाढून ५,३१८ रु. प्रति चौ. फूट झाले. मुंबईत सरासरी मूल्य झाले. मुंबईत सरासरी मूल्य १५ टक्के वाढून ९,४४६ रु. प्रति चौ.फुटावर आले. बंगळुरूमध्ये सरासरी सदनिकेचे मूल्य ११% वाढून ५,१९४ रु. प्रति चौ.फुटांपर्यंत आहेत. अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुण्यात घराच्या किमतीत केवळ २-४ टक्के किरकोळ वाढ झाली. 
 २०४० पर्यंत रिअल इस्टेट क्षेत्र होईल ४६ लाख कोटी रुपयांचे


बीएमटीपीसी बिल्डिंग मटेरियल्स अँड टेक्नॉलॉजी प्रमोशन कौन्सिल(बीएमटीपीसी)नुसार २०४० पर्यंत रिअल इस्टेटचे क्षेत्र वाढून ४६.२ लाख कोटी रुपयांपर्यंत होऊ शकते. एवढेच नव्हे तर याचे सकल राष्ट्रीय उत्पादनात योगदान १४% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे..प्रकल्पातील विलंब आणि दिवाळखोरी प्रक्रियेने आवश्यक रिअल इस्टेटवर परिणाम केला आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे सेक्टरमध्ये सुधारणा दृष्टिपथात दिसते. 
-सतीश मगर, अध्यक्ष क्रेडाई

बातम्या आणखी आहेत...