आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैयक्तिक वादातून एकीने चाकूने चार वार करत केला मैत्रिणीचा खून

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घरी भेटायला आलेल्या मैत्रिणीसोबत वाद झाल्यावर एकीने दुसरीवर चाकूने वार करत दुसरीचा खून केला. अल्तमश कॉलनीमध्ये रविवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. विद्या कृष्णा तांबे (३४, एसटी कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे.विद्या ही रविवारी संध्याकाळी अल्तमश कॉलनीमध्ये राहणारी तिची मैत्रीण निलोफर शेख हिच्या घरी गेली होती. घरी दोघीत चर्चा सुरू असताना त्यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की निलोफरने चाकूने विद्यावर वार केले. अचानक मान, कंबर, पोटात चार वार होताच विद्या कोसळली. निलोफरनेच तिला रुग्णालयात नेले. तोवर तिचा मृत्यू झाला.  

रुग्णालयात तणाव : घटनेची माहिती कळताच दोघींचे कुटुंबीय रुग्णालयात आले. तणाव निर्माण झाला. सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी निलोफर व तिच्या मुलाला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक विजय पवार, दत्ता शेळके यांनी रुग्णालयात दाखल होऊन जमावाला पांगवले.