आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : विद्युत् जामवालचा आगामी चित्रपट 'कमांडो 3' शुक्रवारी रिलीज झाला आहे. यापूर्वी चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंटने प्रमोशनच्या हेतूने अभिनेत्याचा एंट्री सीन यूट्यूबवर शेअर केला. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. झाले असे कि, 5 मिनिटांच्या मोठ्या क्लिपमध्ये एक पहिलवान शाळेच्या मुलीचा स्कर्ट ओढताना दाखवला आहे. हा एक-दोन सेकंदांचा सीन नाहीये तर हा सुमारे 1 मिनिट स्लो मोशन, फास्ट म्यूझिक आणि वेगवेगळ्या अँगलने दाखवला गेला आहे.
मुलीचे लैंगिक शोषण दाखवल्यामुळे नाराज झाले लोक...
सीन दाखवल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने खूप नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जिथे शाळेच्या मुलीचे सेक्शुअल हॅरॅसमेंट दाखवल्यामुळे लोक नाराज आहेत तर दुसरीकडे पहिलवानांची प्रतिमा खराब केल्यामुले याचा विरोध होत आहे. एका यूजरने लिहिले आहे, "कमीत कमी लहान मुलींसोबत तरी असे घाणेरडे सीन चित्रपटात टाकू नका. तिचे काय वय असेल, ती लहान मुलगी आहे." आणखी एका यूजरने लिहिले, "पब्लिसिटीसाठी लहान मुलांची न्यूडिटी दाखवणे योग्य नाहीये." एका यूजरची कमेंटआहे, "छी एवढा घाणेरडा सीन." अनेक यूजर्सने सेंसर बोर्डाला प्रश केला की, त्यांनी हा सीन पास कसा काय केला. मात्र अशातच एका हॉलिवूड चित्रपटात दारूची बॉटल आणि ग्लाससुद्धा ब्लर केला गेला होता.
पहिलवानांचे समर्थन करत एका यूजरने कमेंट केली आहे, "कधीतरी तू पहिलवान केली आहेस का. जे असे सर्व निगेटिव्ह पात्र दाखवत आहेस. थोडीतरी लाज बाळगा." आणखी एका यूजरने लिहिले, "खरेच निराशाजनक, कारण भारतीय पहिलवान असे करू शकत नाही." एका यूजरची कमेंट आहे, "भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदा तालमीतील पहिलवानांचे इतके निकृष्ट चित्रण केले गेले आहे."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.