आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Agra, The Young Man Digging The Foundation Down Under The Soil. In The Soil Trapped For 1 Hour

घरामागे खोदकाम करत होता तरुण; अचानक घडले असे काही की तासभर मातीखाली राहीला दबून, लोकांनी पाहीले तेव्हा सगळेच आले धावून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- घरामागील भागात पाया खोदताना शरिरावर मातीचा ढिगारा कोसळ्याने एक तरुण मातीखाली दबल्याची घटना घडली आहे. अजय असे या तरुणाचे नाव असून तो पिनाहट या गावचा रहीवासी आहे. पाया खोदत असताना शरीरावर मातीच्या ढिगारा कोसळ्याने लोकांनी जवळपास एक तास मोठ्या शर्तीचे प्रयत्न करुन त्याला वाचवले आहे. मानेशिवाय त्याचे संपुर्ण शरीर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. 

 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, अजय त्याच्या घरामागे पाया खोदत होता. तेव्हा पाया खोदत असताना अचानक पाया शेजारच्या भिंतीचा एक मोठा भाग आणि मातीचा ढिगारा त्याच्या शरीरावर कोसळला. त्यामुळे तिथेच तो मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेला. परंतु त्याची मान बाहेर राहील्याने त्याला श्वास घेणे शक्य झाल्याने त्याचा जीव वाचला. त्याने शेजारच्या लोकांना आवाज दिल्यानंतर तातडीने त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. जवळपास तासभर अथक परिश्रम करुन लोकांनी त्याला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...