आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Ajay's Film 'Maidan', Native Footballers From Nine Countries Will Seen On Screen, Completed 50 Percent Shooting Of The Film

अजयच्या 'मैदान'मध्ये नऊ देशांतील मूळ फुटबाॅलपटू झळकतील पडद्यावर, चित्रपटाचे 50 टक्के शूटिंग पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये शूट होईल चित्रपटाचा पुढचा भाग
  • खास दृश्याच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलियन कॅमेरामन क्रीस रीड करणार चित्रीकरण

​​​​​​एंटरटेन्मेंट डेस्क : 'तान्हाजी'सारख्या मेगाबजेट चित्रपटाच्या यशानंतर अजय देवगणची हिंमत आणखी वाढली आहे. आता तो अापल्या आगामी चित्रपटावर आणखी जास्त पैसा खर्च करणार आहे. त्याचा आगामी चित्रपट 'मैदान' भारतीय फुटबॉल टीमचे कोच सईद अब्दुल रहीम यांचा बायोपिक आहे. चित्रपटात भारतीय टीमचा ऑलिम्पिक आणि एशियाडचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. यात भारतीय टीम जगाच्या वेगवेगळ्या देशात फुटबॉल खेळताना दिसणार आहे. ही टीम खरी वाटावी म्हणून निर्माते नऊ देशातील मूळ फुटबॉलपटूंना घेणार आहेत. दिग्दर्शक अमित शर्मा यांनी दैनिक दिव्य मराठीला सांगितले..., चित्रपटात भारतीय टीम वेगवेगळ्या देशांत फुटबॉलचा सामना खेळताना दाखवण्यात येणार आहे. यासाठी आम्ही त्या देशातील त्या-त्या प्रतिष्ठित फुटबॉल टीमच्या खेळाडूंना चित्रपटात घेणार आहोत. तथापि चेल्सी वगैरे टीमचे खेळाडू नसणार हे सर्व लीग प्लेयर्स असतील. हे खेळाडू ऑस्ट्रेलिया, फिनलंड, फ्रान्स, युगोस्लाव्हियासह आणखी काही देशांतून असतील. यांच्याव्यतिरिक्त काही आशियाई देश जसे जपान, थायलंड, व्हियतनामच्या खेळाडूंना घेण्यात येईल.

म्हणून चित्रपटात घेतले मूळ खेळाडूू

  • कलाकारांना खेळताना दाखवणे खूप अवघड असते. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते, त्यात वेळ जातो त्यामुळे थेट खेळाडूंनाच घेतले.
  • कलाकार आणि रिअल फुटबॉलर्सचे हावभाव आणि खेळण्याच्या पद्धतीत मोठे अंतर असते, त्यामुळे निर्मात्यांनी फुटबॉलर्सवर विश्वास ठेवला.
  • चित्रपटात ऑलिम्पिक आणि एशियन गेम्ससारख्या मोठ््या स्पर्धांमध्ये खेळाडूंना खेळताना दाखवणे हे निर्मात्यांसाठी मोठे टास्क होते.
  • ऑस्ट्रेलियन कॅमेरापर्सन क्रीस रीडला खास दृश्यासाठी हायर केले आहे. ते डीओपी तुषार कान्ती रेसोबत मिळून शूट करतील.

५० टक्के पूर्ण झाले आहे शूटिंग

चित्रपटाची ५० टक्के शूटिंग पूर्ण झाली आहे. कोलकाता आणि लखनऊचे शेड्यूल पूर्ण झाले आहे. आता निर्माते १ फेब्रुवारीपासून मुंबईत शूटिंग करतील, ते एप्रिलपर्यंत चालेल. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे,त्यामुळे निर्माते यासाठी हेवी व्हीएफएक्सचा वापर करणार आहेत. मुंबई शेड्यूलनंतर विदेशात शूटिंग सुरू केले जाईल. त्यासाठी अजून लोकेशन ठरले नाही. हेलसिंकी, रोम आणि आस्ट्रेलियाच्या नावाची चर्चा सुरू आहे.