Home | International | Other Country | In America women get jackpot

25 मिनिटांत महिला झाली कोट्यधीश; कोबी खरेदीस जाताना जिंकली दीड काेटी रु.ची लाॅटरी

एजन्सी | Update - Dec 09, 2018, 11:09 AM IST

वाटेत तिने एक लॉटरीचे तिकिट विकत घेतले आणि २ लाख २५ हजार डॉलर (सुमारे १.५ कोटी रुपये) जिंकले.

  • In America women get jackpot

    मेरीलँड- अमेरिकेतील मेरीलँडमध्ये एक महिला फक्त २५ मिनिटात कोट्यधीश झाली आहे. वेनसा वार्ड(३१) नावाची महिला कोबी विकत घेण्यासाठी घरातून बाजारात निघाली. वाटेत तिने एक लॉटरीचे तिकिट विकत घेतले आणि २ लाख २५ हजार डॉलर (सुमारे १.५ कोटी रुपये) जिंकले.

    वेनेसा वॉर्ड म्हणाल्या, वर्जिनिया लॉटरीला सांगितले, तिच्या वडिलांनी कोबी आणण्यास सांगितले होते. वाटेत कोबीसोबत लॉटरीचे तिकिट विकत घेतले. लॉटरीचे तिकिट घेऊन ती घरी आली. घरी येताच तिकिट स्क्रॅच केले आणि नंबर पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिला दोन लाख २५ हजार डॉलरची लॉटरी लागली होती. यावर वेनेसा म्हणाली, ही रक्कम निवृत्तीनंतरच्या काळासाठी राखून ठेवणार आहे. डिस्ने वर्ल्ड पाह्यण्याचे तिचे स्वप्न आहे.

Trending