आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Aurangabad, Sorghum, Millet, Wheat Get Record Prices, Shalu sorghum Gets Rs 3500 To Rs 3800 A Quintal.

औरंगाबादमध्ये ज्वारी, बाजरी, गव्हाला मिळताेय विक्रमी भाव, शाळू-ज्वारीला मिळाला 3500 ते 3800 रुपये क्विंटल भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी शाळू ज्वारीची केवळ ७ क्विंटल आवक झाली. त्या तुलनेत मागणी जास्त होती. त्यामुळे यंदा प्रथमच ३५०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. या विक्रमाची नोंद समिती प्रशासनाने घेतली आहे. नोव्हेंबर मध्ये २९११ रुपये सर्वोच्च दर मिळाला होता.

त्या तुलनेत १४ डिसेंबर रोजी ६०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. याच बरोबर गहू २ हजार ५० ते २४०० रुपये आणि बाजरीला देखील १४६० ते ३ हजार ८१ रुपये विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून महानगरातील ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत असल्याने ओरड वाढली आहे.

हवामानातील बदल, एक पीक पद्धती, कोरडवाहू क्षेत्र अधिक, त्यात कमी जास्त पर्जन्यमान, वाढलेले तापमान, जलपुनर्भरणाचा अभाव व अमर्याद पाण्याचा उपसा यामुळे गव्हाचे ४७, ज्वारी २५, बाजरी ७३ टक्क्यांनी पेरणी क्षेत्रात घट झालेली आहे. म्हणजेच उत्पादनात विक्रमी घट झाली असून त्याचे थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येऊ लागले आहेत. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत १४ डिसेंबर रोजी गव्हाची २० क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी २ हजार ५० आणि जास्तीत जास्त २४०० रुपये, ज्वारीची केवळ ७ क्विंटल आवक झाली व ३५०० ते ३८०० रुपये, बाजरी ७२ क्विंटल आवक व १४६० ते ३ हजार ८१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच गहू, ज्वारी आणि बाजरीला भाव मिळाल्याचे समिती प्रशासनाने नोंद घेतली आहे.

किरकोळ बाजारात भाव भडकले

शहराची लोकसंख्या १७ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. उद्योग, व्यापार, व्यावसाय, मेडिकल, शैक्षणिक हब असलेल्या या महानगरातील ग्राहकांची मागणीच्या तुलनेत बाजार समितीतील आवक प्रचंड घडली आहे. त्यामुळे ठोक बाजारात सर्वच अन्न धान्याला प्रथमच सर्वोच्च दर मिळाला आहे. तर किरकोळ त्यापेक्षा ५ ते १० रुपये अधिक दाने विक्री होत आहे. परिणामी गहू २७ ते ३८, बाजारी २५ ते ३५, ज्वारी ४० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

नवीन धान्य येण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार

नवीन ज्वारी, गहू व उन्हाळ्यातील बाजरी येण्यासाठी मार्च ते एप्रिलपर्यंत वेळ लागणार आहे. तोवर किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आडत व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तूर, मका उत्पादनावर परिणाम

तुरीची ९ क्विंटल आवक झाली व ४७०० ते ४७५१ रुपये, मक्याची ८५५ क्विंटल आवक झाली व १६०० ते १८०० रुपये तर सोयाबीनची केवळ ६ क्विंटल आवक व ३६०० ते ४ हजार ७७ रुपये भाव मिळाला. पहिला कोरडा दुष्काळ व नंतर अतिवृष्टी मुळे खरिपातील मका, सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाला असून गुणवत्ता व दर्जा घसरलेला आहे. त्यामुळे बाजारात कमीत कमी भाव खूपच पडलेले आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...