ऑस्ट्रेलियात 20 डॉक्टरांनी / ऑस्ट्रेलियात 20 डॉक्टरांनी 6 तास सर्जरी करून पोटाला चिकटलेल्या जुळ्या मुलींना केले वेगळे

Nov 11,2018 10:55:00 AM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी पोटाला चिकटलेल्या दोन जुळ्या मुलींना वेगळे करून त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले. या दोघी भूतानच्या रहिवाशी आहेत. त्यांची नावे निमा व दावा अशी आहेत. त्यांना वेगळे करण्यासाठी २० डॉक्टरांच्या पथकाने शुक्रवारी ६ तास अथक परिश्रम घेतले. शस्त्रक्रिया करणारे सर्जन डॉ. जो क्रामेरी यांनी सांगितले, मुलींचे जुळलेले अवयव त्यांच्या जिवाला कोणताही धोका न होता, वेगळे करणे खूप अवघड होते.

कारण दोन्ही पोटाला चिकटलेल्या होत्या. त्यांचे यकृतसुद्धा एकच होते. दोघीं जोडलेल्या आतड्यावर आधारलेल्या होत्या. दोघींना वेगळे करण्यासाठी गेल्या महिन्यात भूतानहून मेलबर्नला आणले होते. परंतु त्यावेळी शस्त्रक्रिया करण्याइतक्या त्या सक्षम नव्हत्या. शारिरिकीदृष्ट्या आणखी सुदृढ होण्यासाठी त्यांना योग्य आहार देण्यात आला. एक महिना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर मुली शस्त्रक्रियेसाठी सक्षम बनल्या. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

X