काही दिवसांपूर्वीच 30 वर्षीय फ्रेडीने एका मुलाला जन्म दिला
दिव्य मराठी वेब
Sep 19,2019 12:19:16 PM ISTकॅनबरा- ऑस्ट्रेलियामध्ये मागील एक वर्षात 22 पुरुषांनी बाळांना जन्म दिल्याची प्रकरणे समोर आली आहेत. डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्विसने बर्थ रेट संबंधित डेटा जाहीर केला. यात सांगितले की, जन्म देणारे सर्व 22 पुरुष ट्रांसजेंडर आहेत. आता या पुरुषांचे नाव त्या 228 पुरुषांच्या यादीत सामील होईल, ज्यांनी मागील 10 वर्षात बाळांना जन्म दिला.
याआधी 2009 पर्यंत याबाबत कोणतीही ऑफिशिअल माहिती किंवा आकडा समोर नव्हता. सेक्स चेंजमधून पुरुष बनल्यानंतर बाळाला जन्म दिल्यामुळए त्यांच्या पुरुषार्थावर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांचे म्हणने आहे की, जर पुरुषांनी बाळाला जन्म दिला, तर तो पुरुष नसतोच.