आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडनी : ऑस्ट्रेलियाच्या जंगलात १३६ ठिकाणी लागलेल्या वणव्यात १.४ कोटी हेक्टर भाग खाक झाला. १०० कोटींहून अधिक वन्य प्राण्यांना प्राण गमवावे लागले. दोन हजारांहून अधिक घरे जळाली व २६ लोकांचा मृत्यू झाला. ही आपत्ती जेवढी भयंकर तेवढ्याच जिद्दीने लोकांनीही आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक माणूस धडपडत आहे. जगभरातील लोकांनी आतापर्यंत हजारो कोटी दान दिले. शिवाय अन्नधान्य, पाणी, वस्त्र, पादत्राणे आणि औषधांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही जगभरातून येत आहेत. नॉर्थ व्हिक्टोरियाच्या महिला फायरफायटर्सनी हा आदर्श घडवला. विशेष म्हणजे याचे नेतृत्व ५२ वर्षीय केरिमान सेलिंग यांच्याकडे आहे. १०० हून अधिक महिलांचे हे पथक दिवस-रात्र काम करत आहे. पिवळ्या वस्त्रातील या पथकाला बनाना ब्रिगेट म्हणून संबोधले जाते. ९०च्या दशकात याची स्थापना झाली. वास्तविक या महिला राहत असलेल्या भागात अग्निशमन दल पोहोचण्यास पाऊण तास लागत होता. त्यामुळे या महिलांनी स्वत:च हे कौशल्य शिकून घेत एका गटाची स्थापना केली. आज तो एक आदर्श ठरला आहे.
जळालेल्या खोडांवर पालवी, दोन दिवसांत ३७ हजार वेळा शेअर झाले छायाचित्र
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील सेंट्रल कोस्ट. एक महिन्यापूर्वी या भागात वणवा पेटला तेव्हा वृक्ष, जमीन आणि सारे काही खाक झाले. मात्र, या जळालेल्या खोडांवर पाऊस नसताना पालवी फुटली. सोशल मीडियात आशेच्या पालवीचे हे छायाचित्र अत्यंत लोकप्रिय झाले असून मर्री लोई यांनी काढलेले हे छायाचित्र फेसबुकवर केवळ ४८ तासांत ३७ हजारहून अधिक वेळा शेअर झाले आहे.
स्टीव्ह इर्विनचे कुटुंबही मदतीसाठी सरसावले
२००६ मध्ये एका माहितीपटाच्या शूटिंगच्या वेळी जलचर प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले क्रोकोडाइल मॅन प्रख्यात स्टीव्ह इर्विन यांचे कुटुंबही प्राण्यांच्या बचावासाठी झटत आहे. त्यांची पत्नी टेरी, २१ वर्षीय मुलगी बिंडी आणि १६ वर्षीय मुलगा रॉबर्ट अहोरात्र वन्य प्राण्यांची सेवा करत आहेत. या कुटुंबाने आतापर्यंत ९० हजारांहून अधिक प्राण्यांवर उपचार केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.