आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात शासनाच्या माध्यमांतील हस्तक्षेपाला विरोध; बातम्या काळ्या शाईने झाकत वृत्तपत्रांनी केला निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात एक अभूतपूर्व घटना घडली. सोमवारी सकाळी देशातील वृत्तपत्रांचे पहिले पान काळे छापण्यात आले. वृत्तपत्रांनी देशातील माध्यमांवर नियंत्रण लादण्यास विरोध म्हणून हे पाऊल टाकले. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये द ऑस्ट्रेलियन, द सिडनी माॅर्निंग हेरॉल्डसारख्या वृत्तपत्रांचा समावेश आहे. वृत्तपत्रांचे म्हणणे आहे की, ऑस्ट्रेलिया सरकारचा कडक कायदा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यापासून त्यांना रोखत आहे.

या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियातील मोठा माध्यम समूह आॅस्ट्रेलियन ब्राॅडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी)चे मुख्यालय आणि एका पत्रकाराच्या घरावर छापा टाकल्याच्या विरोधात वृत्तपत्रांनी काळ्या शाईचा वापर केला. नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या एका न्यायालयाने माध्यमांना लैंगिक शोषणाचे दोषी पाद्री जॉर्ज पेल यांच्यासंदर्भात वृत्त देण्यापासून रोखले होते. यामुळे ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी पेलचे नाव न छापता त्याला दोषी ठरवल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते, तर परदेशी माध्यमांनी त्याचे नाव छापले होते. यानंतर काही दिवसांनंतर पोलिसांनी एबीसीचे संपादकाच्या घरावर छापा टाकला होता.

> माध्यमांचे म्हणणे आहे की, पत्रकारांचे काम वाचकांपर्यंत खरी माहिती पोहोचवणे आहे. यामुळे सरकारने संवेदनशील माहिती मिळवण्यापासून रोखू नये.
 

टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन मीडियाही वृत्तपत्रांसोबत
या मोहिमेला टीव्ही, रेडिओ, ऑनलाइन मीडियाने समर्थन दिले आहे. सरकार सत्यता लपवत असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान मॉरिस यांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या वर कोणीही नाही, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...