आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • In Banaras, Ayushman Performed Ganga Aarti, Worshiping God Before The Release Of Each Film

बनारसमध्ये आयुष्मानने केली गंगा आरती, प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी करतो देवाची आराधना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आयुष्मान खुराना सध्या बनारसमध्ये आहे. जिथे त्याने आपला चित्रपट 'बाला' च्या रिलीजच्या आधी गंगा आरती केली. आरतीनंतरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याने लिहिले आहे की, प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी ब्रह्मांड त्याला सकारात्मक ऊर्जेशी जोडते.  

शेअर केल्या जुन्या आठवणी... 
आयुष्मानने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले, "मी अनेकदा आपल्या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी स्ट्रॉन्ग एनर्जी देणाऱ्या ठिकाणी असतो. मात्र माझा तास काहीही प्लॅन नसतो. 'अंधाधुन' आणि 'बधाई हो' च्या रिलीजपूर्वी मी वैष्णोदेवीला होतो. 'ड्रीम गर्ल' च्या रिलीजच्या वेळी मी लालबागमध्ये होतो आणि 'बाला' च्या रिलीजपूर्वी मी बनारसच्या घाटात आहे. माझ्यापर्यंत सर्व सकारात्मक ऊर्जा पाठवण्यासाठी ब्रह्मांडाचा आभारी आहे." 

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे चित्रपट... 
आयुष्मानचा चित्रपट रिलीजपूर्वी अनेक वादात अडकला आहे. कमल कांत चंद्राने जिथे मेकर्सवर कथा चोरल्याचा आरोप लावला तर सिंगर डॉक्टर जिउसनेदेखील आपली गाणी विना अनुमती रीक्रिएट करून चित्रपटात वापरल्याचा आरोप केला गेला आहे. याव्यतिरिक्त 'उजड़ा चमन' च्या मेकर्सनेही चित्रपटाची कथा, सब्जेक्ट याबद्दल 'बाला' च्या मेकर्स वर नाराजी व्यक्त केली होती.  

ही आहे चित्रपटाची स्टार कास्ट... 
चित्रपटात आयुष्मानसोबत भूमी पेडनेकर, यामी गौतम, सौरभ शुक्ला, जावेद जाफरी यांसारखे कलाकार दिसणार आहेत. आयुष्मान स्वतः या चित्रपटात आपल्या काळातील लीजेंड्स जसे की, राज कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह सुमारे 8 अभिनेत्यांची मिमिक्री करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले आहे आणि प्रोडक्शन दिनेश विजनचे आहे.